advertisement

Google Photos वरुन एकाच वेळी डाउनलोड करता येतात सर्व फोटो, ही आहे सोपी ट्रिक

Last Updated:

Google Photos Download: गुगल फोटोज ही एक उत्तम सेवा आहे जी तुम्हाला तुमचे फोटो आणि व्हिडिओ सुरक्षितपणे स्टोअर करू देते आणि ते कुठूनही अॅक्सेस करू देते.

गुगल फोटोज
गुगल फोटोज
Google Photos Download: गुगल फोटोज ही एक उत्तम सेवा आहे जी तुम्हाला तुमचे फोटो आणि व्हिडिओ सुरक्षितपणे स्टोअर करू देते आणि ते कुठूनही ॲक्सेस करू देते. तुम्हाला तुमचे सर्व फोटो एकाच वेळी डाउनलोड करायचे असतील तर ही प्रोसेस खूप सोपी आहे. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे करू शकता.
Google Takeout वापरा
- Google Photos वरून सर्व फोटो डाउनलोड करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे Google Takeout टूल वापरणे.
Google Takeout वर जा
- तुमच्या वेब ब्राउझरमध्ये Google Takeout उघडा.
- तुमच्या Google अकाउंटने लॉग इन करा.
फोटो सिलेक्ट करा
- Takeout पेजवर तुम्हाला विविध Google सर्व्हिसची लिस्ट दिसेल.
advertisement
- "Deselect all" वर क्लिक करा जेणेकरून सर्व सेवा अनचेक केल्या जातील.
- आता "Google Photos" ऑप्शन शोधा आणि ते चेक करा.
एक्सपोर्ट कस्टमाइज करा
- All photo albums included वर क्लिक करा.
- आता तुमचे सर्व फोटोज तुम्ही निवडू शकता किंवा केवळ काहीखास अल्बम सिलेक्ट करु शकता.
- सिलेक्शन केल्यानंतर "OK" वर क्लिक करा.
advertisement
फाइल सेटिंग्ज निवडा
- तुम्हाला एकदाच फोटो डाउनलोड करायचे असल्यास "Export once" निवडा.
- ZIP फाइल फॉर्मेट निवडा.
- फाइल आकार निवडा (उदा. 2GB, 10GB इ.).
डाउनलोड करा
- “Create export” वर क्लिक करा.
- Google तुमची फाइल तयार करेल, ज्याला काही वेळ लागू शकतो.
- फाइल तयार झाल्यावर, तुम्हाला ईमेलद्वारे नोटिफिकेशन मिळेल.
advertisement
- ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून फाइल डाउनलोड करा.
खबरदारी
तुमच्या डिव्हाइसवर पुरेसे स्टोरेज उपलब्ध असल्याची खात्री करा. ZIP फाइल्स अनझिप करण्यासाठी एक चांगला फाइल मॅनेजर ॲप इंस्टॉल करा. या प्रक्रियेद्वारे, तुम्ही तुमचे सर्व फोटो सहजपणे डाउनलोड करू शकता आणि ते ऑफलाइन सुरक्षित ठेवू शकता.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Google Photos वरुन एकाच वेळी डाउनलोड करता येतात सर्व फोटो, ही आहे सोपी ट्रिक
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement