advertisement

झटपट वाढेल इंटरनेटची स्पीड! राउटर सेटिंग्सला असं करा ऑप्टिमाइज

Last Updated:

योग्य सेटिंग्ज वापरून तुम्ही तुमचा इंटरनेट स्पीड सुधारू शकता. आज आपण राउटरची सेटिंग्ज कशी ऑप्टिमाइझ करायची हे पाहूया. ज्यामुळे तुमचे इंटरनेट कनेक्शन फास्ट आणि स्टेबल होऊ शकेल.

वाय-फाय
वाय-फाय
मुंबई : झपाट्याने बदलणाऱ्या डिजिटल जगात, वेगवान आणि स्थिर इंटरनेट स्पीडची गरज आता प्रत्येक घर आणि ऑफिसची प्राथमिकता बनली आहे. तसंच अनेक वेळा कमी इंटरनेट स्पीडचे कारण म्हणजे राउटरची चुकीची सेटिंग्ज. योग्य सेटिंग्ज वापरून तुम्ही तुमचा इंटरनेट स्पीड सुधारू शकता. आड आपण राउटरची सेटिंग्ज कशी ऑप्टिमाइझ करायची ते पाहूया. ज्यामुळे तुमचे इंटरनेट कनेक्शन फास्ट आणि स्टेबल होईल.

राउटर सेटिंग्ज ऑप्टिमाइझ करण्यासाठी टिप्स

राउटर योग्य ठिकाणी ठेवा - राउटर घराच्या मध्यभागी आणि उंचीवर ठेवा जेणेकरून सिग्नल सर्वत्र पोहोचेल. भिंती आणि धातूच्या वस्तू सिग्नलला ब्लॉक करू शकतात.
योग्य चॅनेल आणि फ्रीक्वेंन्सी निवडा – 2.4 GHz आणि 5 GHz दोन्ही बँड वापरा. 2.4 GHz लांब अंतरासाठी चांगले आहे, तर 5 GHz वेगवान स्पीडसाठी आहे.
advertisement
फर्मवेअर अपडेट करा- राउटरचे फर्मवेअर वेळोवेळी अपडेट करा जेणेकरून ते नवीन फीचर्स आणि सुरक्षिततेने सुसज्ज असेल.
गेस्ट नेटवर्क वापरा - अतिरिक्त डिव्हाइस मुख्य नेटवर्कपासून वेगळे ठेवण्यासाठी गेस्ट नेटवर्क सेट करा. यामुळे मुख्य नेटवर्कवरील लोड कमी होईल.
क्वालिटी ऑफ सर्व्हिस– व्हिडिओ कॉल किंवा गेमिंग सारख्या कोणत्या डिव्हाइसेस किंवा ॲप्लिकेशन्सना प्राधान्य मिळेल हे ठरवण्यासाठी राउटरच्या QoS सेटिंग्ज वापरा.
advertisement
मजबूत पासवर्ड सेट करा – राउटरच्या वाय-फाय नेटवर्कला मजबूत पासवर्डसह संरक्षित करा जेणेकरून अनावश्यक डिव्हा कनेक्ट होणार नाहीत.
या टिप्ससह तुमची राउटर सेटिंग्ज ऑप्टिमाइझ करणे खूप सोपे आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय तुमची इंटरनेट स्पीड आणि कनेक्शन स्थिरता सुधारू शकता. योग्य स्थान, फ्रीक्वेंन्सी निवडून आणि सुरक्षा उपायांचे पालन करून, तुम्ही तुमचा इंटरनेट अनुभव सर्वोत्तम बनवू शकता.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
झटपट वाढेल इंटरनेटची स्पीड! राउटर सेटिंग्सला असं करा ऑप्टिमाइज
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement