याहूनही मोठा धोका म्हणजे जर एखाद्या सायबर गुन्हेगाराने तुमचे गुगल अकाउंट किंवा स्मार्ट डिव्हाइस हॅक केले तर ते तुमच्या सर्व व्हॉइस डेटामध्ये प्रवेश मिळवू शकतात, ज्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणूनच, गुगलची "हेरगिरी" कशी थांबवायची आणि तुमची प्रायव्हसी कशी सुरक्षित करायची हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. सुदैवाने, गुगल त्याच्या यूझर्सना हा डेटा नियंत्रित करण्याची परवानगी देते. तुम्ही तुमच्या "डेटा अँड प्रायव्हसी" सेटिंग्जमध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग बंद करू शकता.
advertisement
YouTubeवर आलं जबरदस्त फीचर! 27 भाषांमध्ये ऐकू शकता आवडता व्हिडिओ
व्हॉइस अँड ऑडियो अॅक्टिव्हिटी कशी करावी ऑफ
- सर्वात आधी आपल्या अँड्रॉइड फोन किंवा टॅबलेटमध्ये सेटिंग्स अॅप ओपन करा नंतर गुगलवर जा.
- यानंतर Manage your Google account वर क्लिक करा.
- नंतर Data & privacy वर जा.
- यानंतर History settings च्या आत Web & App Activity वर टॅप करा.
- नंतर Include voice and audio activity बॉक्स अनचेक करा.
Amazonचा मोठा प्लॅन! Prime यूझर्सला फ्री मिळेल Alexa Plus AI, याचा काय होईल फायदा
ही सेटिंग बंद करण्याचा काय फायदा?
गुगलच्या मते, एकदा ही सेटिंग बंद केल्यानंतर, गुगल सर्च, असिस्टंट आणि मॅप्स सोबतच्या तुमच्या संवादांचे ऑडिओ रेकॉर्डिंग तुमच्या खात्यात सेव्ह केले जाणार नाहीत. तुम्ही साइन इन केले असले तरीही, तुमचा व्हॉइस डेटा सुरक्षित राहील आणि गुगल तो स्टोअर करू शकणार नाही. तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी वेळोवेळी या प्रायव्हसी सेटिंग्ज तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
