Amazonचा मोठा प्लॅन! Prime यूझर्सला फ्री मिळेल Alexa Plus AI, याचा काय होईल फायदा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Amazonने आपल्या नवीन Alexa Plus AI सर्व्हिसला जास्त यूझर्ससाठी ओपन केले आहे. मात्र सध्या याचा फायदा फक्त Prime सब्सक्राइबर्सला मिळतोय. कंपनी याला हळुहळू रोलआउट करते जेणेकरुन पब्लिक लॉन्चपूर्वी फीचर्स चांगले बनवता येतील.
नवी दिल्ली : अॅमेझॉनने आपली नवी Alexa Plus AI सर्व्हिस जास्त लोकांसाठी उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. खरंतर कंपनीने यामध्ये एक अट ठेवली आहे. की फ्री अॅक्सेस त्याच यूझर्सना मिळेल, जे पहिल्यापासूनAmazon Prime सब्सक्रिप्शन घेतात. Amazon या AI असिस्टेंटविषयी खूप सतर्क आहेत आणि ते हळुहळू रोलआउट करत आहेत जेणेकरुन पब्लिक रिलीजपूर्वी प्रत्येक फीचर त्याची क्वालिटी स्टँडर्ड सिद्ध करतील.
कंपनीच्या मते, Alexa Plus सध्या उबर बुक करणे, ईमेल ड्राफ्ट करणे आणि प्रोडक्ट सर्च करणे यासारखी कामे करू शकते. अमेझॉनचे म्हणणे आहे की ते भविष्यात अधिक स्मार्ट फीचर्स जोडेल, ज्यामुळे ते फुल फंक्शनल AI असिस्टंट बनेल.
Prime मेंबर्स का मिळतोय मोठा फायदा
Alexa Plus ही एक पेड सर्व्हिस आहे. जिची किंमत 19.99 डॉलर म्हणजेच जवळपास 1,720 रुपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे. तर Amazon Prime मेंबर्स जे 14.99 डॉलर म्हणजेच जवळपास 1,290 रुपये प्रति महिना पहिल्यापासून देत आहेत. त्यांना ही नवीन Alexa AI सर्व्हिस कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळतेय. या पॅकेजमध्ये Alexa चा नवा एआय अवतार आणि अडव्हान्स फीचर्सही समाविष्ट आहेत. ज्यामुळे प्राइम सब्सक्रिप्शनची व्हॅल्यू आणखी वाढू शकते.
advertisement
नवीन अलेक्सा Alexa AI अमेरिकेपुरते मर्यादित
खरंतर, अॅमेझॉनने स्पष्ट केले आहे की, अलेक्सा प्लस आणि त्याचा नवीन एआय अवतार सध्या फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे. भारतासह इतर देशांमधील यूझर्सना त्याच्या जागतिक लाँचची वाट पहावी लागेल. कंपनी सध्या अमेरिकन बाजारपेठेतील यूझर्स ते कसे वापरत आहेत आणि कोणत्या सुधारणांची आवश्यकता आहे याचा तपास करत आहे.
advertisement
वेब आणि अॅपवरही फ्री अॅक्सेस उपलब्ध
अॅमेझॉनने Alexa Plus वापरण्याच्या अटींमध्येही बदल केले आहेत. यूझर्स आता अलेक्सा वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे ते फ्री वापरू शकतात. या व्हर्जनला प्राइम सदस्यत्वाची आवश्यकता नाही, परंतु त्याची फीचर्स मर्यादित असतील. हे चॅटबॉट म्हणून काम करेल, ज्यामुळे यूझर्सना प्रश्न विचारता येतील किंवा प्रवास योजनांमध्ये मूलभूत मदत घेता येईल.
advertisement
AI रेसमध्ये Amazonची नवीन रणनीती
अमेझॉनचे हे पाऊल खूपच मनोरंजक मानले जात आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा जेमिनी आणि चॅटजीपीटी सारखी एआय टूल्स वेब ब्राउझरवर अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. अमेझॉनचे म्हणणे आहे की अलेक्सा प्लस नोव्हा आणि अँथ्रोपिकच्या एआय मॉडेल्सद्वारे समर्थित आहे, ज्यामुळे त्याची क्षमता आणखी मजबूत होते.
advertisement
Alexa Plus काय करु शकतो?
Alexa Plus मध्ये एंजेटिक क्षमताही दिल्या आहेत. म्हणजेच ते यूझर्सकडून जेवण ऑर्डर करु शकते. आवडता कॅफे शोधूशकते. कॅब बुक करु शकते आणि स्मार्ट होम डिव्हाइसेसला ऑटोमेट करु शकते. Amazon चा दावा आहे की, अर्ली अॅक्सेस प्रोग्राम अंतर्गत अमेरिकेत लाखो लोक पहिल्यापासून याचा वापर करत आहेत.
advertisement
भारताला नवीन अलेक्सा कधी मिळेल?
अलेक्साच्या एआय व्हर्जनचे पुनरागमन उत्साहवर्धक असले तरी, अमेरिकेत अमेझॉनची मर्यादित उपलब्धता अनेक प्रश्न उपस्थित करते. भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेतील यूझर्स अजूनही हे एआय असिस्टंट कधी लाँच होईल याची वाट पाहत आहेत. अशी आशा आहे की, कंपनी लवकरच ते इतर देशांमध्ये रिलीज करेल जेणेकरून अलेक्सा एआय इतर एआय प्लॅटफॉर्मवर शिकू शकेल, सुधारू शकेल आणि स्पर्धा करू शकेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 2:39 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Amazonचा मोठा प्लॅन! Prime यूझर्सला फ्री मिळेल Alexa Plus AI, याचा काय होईल फायदा









