TRENDING:

Chrome यूझर्स सावधान! CERT-Inने जारी केला हाय-अलर्ट, लगेच करा हे काम

Last Updated:

CERT-In Warns Chrome Users: CERT-In ने Google Chrome यूझर्सना इशारा दिला आहे की Windows, macOS आणि Linux मध्ये अनेक सुरक्षा त्रुटी आणि भेद्यता आढळून आल्या आहेत. हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेऊ शकतात आणि त्यांच्या सिस्टममध्ये धोकादायक कोड इंजेक्ट करू शकतात. म्हणून, ऑर्गेनायजेशनने यूझर्सना Chrome ला तात्काळ लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Google Chrome Alert: Google Chrome यूझर्ससाठी एक मोठा इशारा आहे. CERT-In ने डेस्कटॉप यूझर्ससाठी सुरक्षा सल्ला जारी केला आहे. हॅकर्स Windows, macOS आणि Linux वरील Chrome मधील त्रुटी आणि भेद्यता वापरून धोकादायक कोड चालवू शकतात. एजन्सीने सर्व Windows, macOS आणि Linux यूझर्स आणि संस्थांना सायबर हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे ब्राउझर लेटेस्ट अपडेटवर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
क्रोम
क्रोम
advertisement

Google Chrome यूझर्ससाठी जारी केलेला इशारा

8 ऑक्टोबर रोजी, CERT-In ने CIVN-2025-0250 वलनेरिबिलिटी नोट जारी केली. ज्यामध्ये Windows, macOS आणि Linux वरील Google Chrome मधील कमजोरिया डिटेल्समध्ये आहेत. अॅडव्हायजरीनुसार, एखादा यूझर घोटाळा किंवा फसव्या वेबसाइटला भेट देतो. तर हॅकर्स डिव्हाइसला रिमोटली प्रवेश करण्यासाठी या त्रुटी सहजपणे वापरू शकतात. म्हणून, यूझर्सना Chrome त्वरित अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

advertisement

WhatsAppचा अंदाज बदलणार! आलंय Instagram सारखं फीचर, पाहून व्हाल खुश

सर्वात गंभीर सिक्योरिटी फ्लोचा वापर करून, हॅकर्स यूझर्च्या कंप्यूटरवर अनियंत्रित कोड चालवू शकतात किंवा सिस्टमला प्रतिसाद देणे थांबवू शकतात. ही त्रुटी हॅकर्सना प्रभावित सिस्टमवरील संवेदनशील माहितीमध्ये प्रवेश करण्यास देखील अनुमती देऊ शकते. विंडोज आणि मॅकसाठी 141.0.7390.65/.66 पूर्वी आणि लिनक्ससाठी 141.0.7390.65 पूर्वीच्या गुगल क्रोम व्हर्जनमध्ये या भेद्यता आढळल्या आहेत. त्यांना CVE-2025-11211, CVE-2025-11460 आणि CVE-2025-11458 म्हणून ओळखले जाते.

advertisement

हॅकर्सपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे

CERT-In ने सर्व यूझर्स आणि संस्थांना शक्य तितक्या लवकर गुगल क्रोम लेटेस्ट सॉफ्टवेअर व्हर्जनमध्ये अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. विंडोज आणि मॅक यूझर्सना 141.0.7390.65/.66 व्हर्जन अपडेट इंस्टॉल करण्याचा सल्ला दिला आहे आणि लिनक्स यूझर्सना 141.0.7390.65 सॉफ्टवेअर अपडेट इंस्टॉल करण्याचा सल्ला दिला आहे. हे तुमच्या सिस्टमला ब्राउझरमधील त्रुटींमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यापासून वाचवेल.

advertisement

Instagram वर Reel बनवून मिळवा Gold Ring! 'या' लोकांना मिळेल खास अवॉर्ड

तुमची सिस्टम कशी अपडेट करावी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गावची कारभारी, MPSC शिकणारी! स्नेहल बनली नगरसेविका; अशी जिंकली निवडणूक!
सर्व पहा

सुरक्षा वाढवण्यासाठी यूझर्स Google Chrome ला ऑटोमॅटिक अपडेट्सवर सेट करू शकतात. पर्यायी म्हणून, ब्राउझरच्या थ्री-डॉट मेनू > Help > About Google Chrome वर क्लिक करा. तुम्ही मॅन्युअली देखील अपडेट करू शकता. Chrome ऑटोमॅटिक लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करेल आणि नवीन अपडेट इंस्टॉल झाल्यानंतर, तुम्ही बदल लागू करण्यासाठी ब्राउझर रीस्टार्ट करू शकता.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Chrome यूझर्स सावधान! CERT-Inने जारी केला हाय-अलर्ट, लगेच करा हे काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल