गावची कारभारी, MPSC शिकणारी! अवघ्या 22 वर्षांची स्नेहल बनली नगरसेविका; अशी जिंकली निवडणूक!
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
स्नेहल धुपे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेची तयारी करत होती. एमपीएससी करता करता स्नेहल नगरसेविका झाली.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील उच्चशिक्षित तरुणी स्नेहल धुपे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेची तयारी करत होती. एमपीएससी करता करता स्नेहल नगरसेविका झाली. कुटुंबात कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अवघ्या 22 वर्षांच्या स्नेहलने नगरपंचायत निवडणुकीमध्ये बाजी मारली असून 21 डिसेंबरपासून नगरसेविका म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. स्नेहल धुपे शिवसेना (उबाठा) यांनी शिंदे सेनेच्या सविता माने यांचा 19 मतांनी पराभव केला. स्नेहल धुपे यांना एकूण 967 मते तर सविता माने यांना एकूण 948 मते मिळाली. स्नेहल धुपेंचा एमपीएससी ते नगरसेविका होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
एमपीएससी तयारी ते नगरसेविका प्रवास
छत्रपती संभाजीनगर शहरातील श्रेयस महाविद्यालय येथे बी. फार्मसीचे पदवीपर्यंतचे शिक्षण जून 2025 मध्ये पूर्ण केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या शासकीय पदांसाठी असलेल्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि अधिकारी होण्याचा निर्णय घेतला होता, कारण की नागरिकांसाठी आणि समाजासाठी काहीतरी सेवा करावी या उद्देशाने पुढील तयारी सुरू केली मात्र नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. समाजामध्ये अनेक नागरिकांच्या समस्या लक्षात आल्या आणि त्या समस्या कुठेतरी चांगल्या पद्धतीने सोडवता येतील असे वाटले म्हणून नगरसेविका पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
advertisement
त्यावेळी दत्ता बोर्डे आणि माझे भाऊ बंटी धुपे यांनी सहकार्य केले आणि ही निवडणूक लढली आणि नगरसेविका म्हणून निवडून आले, अशी प्रतिक्रिया स्नेहल धुपे यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली.
advertisement
पैठणमध्ये कोणत्या मुद्द्यांवर काम..
पैठण पर्यटन स्थळ आहे, पैठण शहराला दक्षिणची काशी असे म्हटले जाते. शहरातील रस्त्यांचे प्रश्न असतील, पाण्याच्या समस्या, कचरा व्यवस्थापन, आरोग्याच्या दृष्टीने काही बदल करणे आणि महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जाईल, असे देखील धुपे यांनी म्हटले आहे.
स्त्रियांनी राजकारणात यावं का ?
view commentsस्त्रियांनी नक्कीच राजकारणामध्ये यायला हवे, स्त्रियांनी राजकारणामध्ये प्रवेश करणे हे एक विकासाच्या दृष्टीने मोठे पाऊल असते. कारण की स्त्रियांच्या समस्या या स्त्रियाच समजून घेऊन त्यावर काम करू शकतात. त्यामुळे स्त्रियांनी राजकारणात यावे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 9:22 PM IST
मराठी बातम्या/Politics/
गावची कारभारी, MPSC शिकणारी! अवघ्या 22 वर्षांची स्नेहल बनली नगरसेविका; अशी जिंकली निवडणूक!









