Tea : तुम्ही पित आहात तो खरंच 'चहा' आहे का? FSSAI चा मोठा निर्णय; आता 'या' पेयांना चहा म्हणता येणार नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Is Your Tea Really Tea : तुम्ही ज्याला आजवर 'हर्बल टी' किंवा 'फुलांचा चहा' म्हणून पित होता, त्याला आता 'चहा' म्हणणं बेकायदेशीर ठरणार आहे.
सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत आपल्यापैकी अनेकांना फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे वाफाळलेला चहा. चहा आपल्या संस्कृतीचा असा भाग बनला आहे की, पाहुण्यांचं स्वागत असो किंवा डोकेदुखीवरचा उपाय, चहाशिवाय पान हलत नाही. गेल्या काही वर्षांत आरोग्याप्रती जागरूक झालेल्या लोकांनी 'हर्बल टी', 'फ्लॉवर टी' किंवा 'रोयबॉस टी' असे नवनवीन प्रकार प्यायला सुरुवात केली आहे. आपल्याला वाटतं की आपण चहाचाच एक आरोग्यदायी प्रकार पितोय.
advertisement
पण थांबा! तुम्ही ज्याला आजवर 'हर्बल टी' किंवा 'फुलांचा चहा' म्हणून पित होता, त्याला आता 'चहा' म्हणणं बेकायदेशीर ठरणार आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलं. भारताची अन्न सुरक्षा संस्था म्हणजेच FSSAI (Food Safety and Standards Authority of India) ने याबद्दल एक अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. तुमच्या लाडक्या चहाची व्याख्या आता अधिकृतपणे बदलली आहे. नेमकं प्रकरण काय आहे, चला जाणून घेऊया.
advertisement
केवळ 'या' झाडापासून बनलेलाच चहाFSSAI ने 25 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या नवीन नियमावलीनुसार, केवळ 'कॅमेलिया सायनेन्सिस' (Camellia sinensis) या वनस्पतीपासून बनवलेल्या उत्पादनांनाच कायदेशीररीत्या 'चहा' (Tea) म्हणता येईल. चहाची पावडर, हिरवा चहा (Green Tea), कोरा चहा हे सर्व या वनस्पतीपासून मिळतात, त्यामुळे त्यांना चहा म्हणण्यास हरकत नाही.
advertisement
advertisement
advertisement
दुसऱ्या कोणत्याही झाडाच्या अर्काला 'चहा' म्हणणे हे दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे आता नवीन नियमांनुसार, पॅकेटच्या दर्शनी भागावर त्या अन्नाचे खरे स्वरूप काय आहे, हे लिहिणे बंधनकारक आहे. जर उत्पादनात 'कॅमेलिया सायनेन्सिस' नसेल आणि तरीही त्यावर 'Tea' असा शब्द वापरला असेल, तर तो 'मिसब्रँडिंग'चा गुन्हा मानला जाईल.
advertisement
आता 'हर्बल टी'ला काय म्हणावे लागणार?ज्या पेयांमध्ये चहाची पानं नसतात, त्यांना आता 'टी' (Tea) ऐवजी 'हर्बल इन्फ्युजन' (Herbal Infusion) किंवा 'ब्लेंड्स' (Blends) असे म्हणावे लागेल. हे नियम उत्पादक, पॅकर्स, आयातदार आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स (उदा. Amazon, BigBasket) या सर्वांना लागू असतील. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले, तर अन्न सुरक्षा कायदा २००६ नुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
advertisement
आपण जेव्हा दुकानात जातो, तेव्हा पॅकेटवरचं 'Tea' हे मोठं अक्षर पाहतो, पण त्यातील घटक (Ingredients) कधीच वाचत नाही. आपल्याला वाटतं की ग्रीन टी आरोग्यदायी आहे, मग तसाच हा फुलांचा चहाही असेल. पण आता इथून पुढे खरेदी करताना सावध राहा. जर तुम्हाला खरोखरच 'चहा' प्यायचा असेल, तर तो 'कॅमेलिया सायनेन्सिस' या झाडापासूनचाच हवा, हे लक्षात ठेवा.
advertisement








