Tata आता अख्खं मार्केट करणार जाम, आणतेय 3 धाकड अशा SUV, कुणीच देणार नाही टक्कर!
- Published by:Sachin S
Last Updated:
Tata Sierra मुळे टाटाने जोरदार कमबॅक केलं आहे. आता टाटा मोटर्स पुढील वर्षात एकापाठोपाठ ३ अशा गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहे.
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनीपैकी एक असलेल्याा टाटा मोटर्सने अलीकडे Tata Sierra एसयूव्ही लाँच केली आहे. Tata Sierra मुळे टाटाने जोरदार कमबॅक केलं आहे. आता टाटा मोटर्स पुढील वर्षात एकापाठोपाठ ३ अशा गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये ईलेक्ट्रिक एसयूव्ही असणार आहे. टाटाने आतापर्यंत 2.5 लाखांपेक्षा जास्त इलेक्ट्रिक कारची विक्री केली आहे. यामध्ये 1 लाखपेक्षा जास्त यूनिट्स फक्त नेक्सॉन ईव्हीचे आहे.
2026 मध्ये 3 नवी इलेक्ट्रिक मॉडेल करणार लाँच
२०२६ मध्ये Sierra EV, अपडेटेड पंच EV आणि अविन्या EV हे तीन नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स येणार आहेत. सिएरा EV आणि पंच EV २०२६ च्या पहिल्या सहामाहीत येतील, तर प्रीमियम अविन्या रेंज दुसऱ्या सहा महिन्यात लाँच होणार आहे
प्रीमियम Tata Avinya EV
Tata Avinya EV ही टाटाची नवीन प्रीमियम इलेक्ट्रिक प्रोडक्ट पोर्टफोलिओ असेल, जी Gen-3 बॉर्न इलेक्ट्रिक आर्किटेक्चरवर आधारित असेल. Tata Avinya EV ची झलक ही २०२५ च्या दिल्लीतील ऑटो शोमध्ये पाहण्यास मिळाली होती. Tata Avinya EV ही एक टाटाची फ्युचर कन्सेप्ट कार आहे. या कारचं डिझाइन हे युनिक असं आहे. यामध्ये यूनिक ग्रिल, फुल-विथ एलईडी लाइट बार, स्लिम हेडलॅम्प्स, डॅशबोर्डमध्ये इंटिग्रेटेड स्लिम स्क्रीन, नवीन स्टीयरिंग व्हील असणार आहे.
advertisement

तसंच, Tata Avinya EV मध्ये नेक्स्ट-जेन ADAS, OTA अपडेट्स, अल्ट्राफास्ट चार्जिंग, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आणि इंटीग्रेटेड प्रोपल्शन सिस्टमसारखी अॅडव्हान्स टेक्नोलॉजी मिळणार आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर ५०० किमी रेंज देऊ शकते. एवढंच नाहीतर कारची बॅटरी फक्त ३० मिनिटांमध्ये चार्ज होईल.
advertisement
Tata Sierra EV करणार धमाका
Tata च्या Sierra ने आधीच मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहेत. आता tata sierra चं इलेक्ट्रिक व्हर्जन 2026 मध्ये २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी tata sierra चं EV मॉडेल लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. टाटा मोटर्सची Tata Sierra ही इलेक्ट्रिक कार acti.ev प्लॅटफॉर्मवर बेस असणार आहे. जी रियर व्हिल ड्राइव्ह आणि ऑल व्हिल ड्रॉइव्ह या दोन्ही प्रकारात येणार आहे. Tata Sierra मध्ये दोन बॅटरीचे पॅक असणार आहे. त्यामुळे कार एकदा फुल चार्ज केल्यावर 450 ते 550 किलोमीटर इतकी रेंज मिळण्याची चिन्ह आहे.
advertisement
Tata Punch EV
view commentsटाटा मोटर्स आपली लोकप्रिय Tata Punch EV चं सुद्धा अपडेटेट मॉडेल २०२६ च्या पहिल्या सहामाहीत लाँच करण्याच्या तयारीत आहे. सिएराचा इलेक्ट्रिक व्हर्जन आपला प्लॅटफॉर्म आणि पॉवरट्रेन हॅरियर EV सोबत शेअर करू शकतो. डिझाईन आणि फीचर्समध्ये फारसे बदल होणार नाहीत, पण ईवी व्हर्जनमध्ये काही खास सॉफ्टवेअर अपग्रेड्स आणि बॅज मिळू शकतात. 2026 च्या Tata Punch EV फेसलिफ्टमध्ये डिझाईनमध्ये बदल आणि फीचर अपग्रेड्स केले होते. आता नव्या अपडेटेड मॉडेलमध्ये नेक्सॉन EV सारखा 45kWh बॅटरी पॅक मिळू शकतो, जो फुल चार्जवर 489 किमी रेंज देते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 8:00 PM IST










