Kitchen : रोज भांडी जास्त का होतात? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच, तुमचं किचन मनेजमेंट यासाठी कारणीभूत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी विचार केलाय का, की काही घरांमध्ये कमी भांडी निघतात आणि काही घरांमध्ये भांड्यांचे ढीग लागतात? पण असं का होतं, खरंतर याचं उत्तर आपल्या स्वयंपाकाच्या सवयींमध्ये दडलेलं आहे.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वयंपाकघरातल्या सिंकमध्ये भांड्यांचा डोंगरच उभाच असतो. कितीदा ही भांडी घासा तरी भांडी काही कमी होत नाहीत. चहाचे कप, नाश्त्याच्या प्लेट्स, दुपारचं जेवण आणि मग रात्रीचं जेवण सिंक नेहमी फूल... असं वाटतं की भांडी धुण्याचं काम कधी संपणारच नाही. त्यामुळे नेहमीच महिलांच्या तोंडात एकच वाक्य असतं, "किती ही भांडी! संपता संपत नाहीत."
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'उरलंय तर दुसऱ्या भांड्यात काढा' ही सवयभाजी किंवा आमटी थोडी उरली की आपण लगेच ती मोठ्या पातेल्यातून काढून छोट्या डब्यात भरतो आणि ते मोठं पातेलं सिंकमध्ये टाकतो. यामुळे नको असलेली भांडी वाढतात.काय कराल? जर भाजी थोडीच उरली असेल, तर ती त्याच भांड्यात झाकून ठेवा किंवा थेट जेवताना संपवा. उगाच 'भांडं बदलण्याची' सवय टाळा.
advertisement
चहाच्या कपांचा पाऊसदिवसभरात जेवढी माणसं तेवढ्या वेळा चहा होतो. प्रत्येक वेळी नवा कोरा कप काढला जातो. पाहुणे आले की तर विचारूच नकाकाय कराल? घरातील सदस्यांना स्वतःचा कप स्वतः धूवून ठेवण्याची सवय लावा. पाहुण्यांसाठी काचेचे कप वापरण्यापेक्षा स्टीलचे पेले वापरा जे पटकन धूता येतात किंवा मग पेपरकप वापरा.
advertisement
हातासरशी स्वच्छता नाहीभांडी जास्त का वाटतात? कारण आपण ती साठवून ठेवतो. दूध तापवलं की पातेलं लगेच न धूता सिंकमध्ये जातं. मग त्यातलं दूध सुकतं आणि ते घासायला जास्त वेळ लागतो.काय कराल? 'क्लीनिंग व्हाईल कुकिंग' हा मंत्र लक्षात ठेवा. कुकरची शिट्टी होईपर्यंत हातातील छोटे चमचे किंवा वाटी धूवून टाका. हातासरशी झालेली कामं ओझं वाटत नाहीत.
advertisement
advertisement
आपण अनेकदा म्हणतो, "जाऊदे, आता थकले आहे, भांडी सकाळी घासू." पण रात्रीची उष्टी भांडी बेसिनमध्ये राहिली की ती सकाळी 'डोंगर' वाटतात. रात्री फक्त 5 मिनिटं काढून जर सिंक रिकामं केलं, तर सकाळची सुरुवात खूप प्रसन्न होते.भांडी कमी होणं हे सर्वस्वी आपल्या मॅनेजमेंटवर अवलंबून आहे. स्वयंपाक करतानाच जर आपण थोडी शिस्त लावली, तर पाठीचं दुखणं आणि भांड्यांचा कंटाळा दोन्ही पळून जातील. आजपासूनच 'कमीत कमी भांडी' हा नियम स्वतःला लावून बघा.









