महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक जाहीर, ४० नावांची घोषणा

Last Updated:

मुंबई पुणे आणि पिंपरी चिंचवडसह महत्त्वाच्या महापालिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती-आघाडीसंदर्भात इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत आघाडीच्या घोषणेसह जागा वाटपही जाहीर करण्यात येईल.

अजित पवार
अजित पवार
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली आहे. अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासहित ४० नावांची घोषणा पक्षाकडून करण्यात आली.
मुंबई पुणे आणि पिंपरी चिंचवडसह महत्त्वाच्या महापालिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती-आघाडीसंदर्भात इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत आघाडीच्या घोषणेसह जागा वाटपही जाहीर करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे ४० स्टार प्रचारकांच्या नावांची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, शरद पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे प्रमुख नेते नजीब मुल्ला, श्रीमती प्रतिभाताई शिंदे, विकास पासलकर आदींचा समावेश आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक जाहीर, ४० नावांची घोषणा
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement