'आपल्या भावा-बहि‍णींना जिवंत जाळतायत, जर तुम्हाला राग येत नसेल...', बांगलादेशातील अत्याचारावर जान्हवी कपूरचा संताप

Last Updated:
Janhvi Kapoor on Bangladesh Lynching: जेव्हा मोठे सुपरस्टार्स आणि प्रोग्रेसिव्ह म्हणवून घेणारे कलाकार अशा विषयांवर मौन बाळगतात, तेव्हा जान्हवीने घेतलेली ही भूमिका अनेकांना चकित करणारी ठरली आहे.
1/11
मुंबई: नेहमी ग्लॅमरस फोटो आणि चित्रपटांमुळे चर्चेत असणारी जान्हवी कपूर सध्या एका अत्यंत गंभीर आणि धाडसी भूमिकेमुळे सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरली आहे.

advertisement
2/11
बांगलादेशात सध्या अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांनी सीमा ओलांडली असून, तिथे दिपू चंद्र दास नावाच्या एका तरुण हिंदू कामगाराची ज्या अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली, त्यावर जान्हवीने चक्क सडेतोड भूमिका घेतली आहे.

3/11
जेव्हा मोठे सुपरस्टार्स आणि प्रोग्रेसिव्ह म्हणवून घेणारे कलाकार अशा विषयांवर मौन बाळगतात, तेव्हा जान्हवीने घेतलेली ही भूमिका अनेकांना चकित करणारी ठरली आहे.

4/11
मयमनसिंग जिल्ह्यातील भालुका परिसरात दिपू चंद्र दास हा तरुण एका कपड्याच्या फॅक्टरीत काम करायचा. गुरुवारी रात्री एका हिंसक जमावाने त्याला पकडलं. केवळ ईश्वर निंदेच्या अफवेवरून या जमावाने त्याला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.

5/11
इतक्यावरच हे क्रौर्य थांबलं नाही, तर त्या जमावाने दिपूला एका झाडाला बांधलं आणि जिवंत जाळलं. या घटनेने संपूर्ण जग हादरलं असून, जान्हवीने यावर इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जान्हवीने आपल्या पोस्टमध्ये अत्यंत जळजळीत शब्दांचा वापर केला आहे.

6/11
तिने लिहिलंय,
तिने लिहिलंय, "बांगलादेशात जे सुरू आहे ते रानटीपणाचं टोक आहे. ही केवळ हत्या नाही, तर सामूहिक हत्याकांड आहे. जर या अमानुष कृत्याचे व्हिडिओ पाहून आणि याबद्दल वाचूनही तुमच्या मनात राग येत नसेल, तर लक्षात ठेवा, आपला हाच ढोंगीपणा आपल्याला संपवून टाकेल."
advertisement
7/11
तिने पुढे बॉलिवूडच्या निवडक भूमिकेवरही निशाणा साधला. जान्हवी म्हणते,
तिने पुढे बॉलिवूडच्या निवडक भूमिकेवरही निशाणा साधला. जान्हवी म्हणते, "आपण जगाच्या दुसऱ्या टोकाला घडणाऱ्या गोष्टींसाठी अश्रू ढाळतो, पण आपल्याच शेजारी आपल्या भावा-बहिणींना जिवंत जाळलं जातंय, त्यावर मात्र गप्प बसतो. कोणत्याही स्वरूपातील कट्टरवाद हा नाकारलाच पाहिजे."
advertisement
8/11
जान्हवीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर, विशेषतः रेडिटवर तिचं भरभरून कौतुक होतंय. नेटकऱ्यांनी म्हटलंय की,
जान्हवीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर, विशेषतः रेडिटवर तिचं भरभरून कौतुक होतंय. नेटकऱ्यांनी म्हटलंय की, "जिथे इतर कलाकार मुस्लीम मार्केट किंवा आपल्या प्रतिमेला धक्का लागेल म्हणून गप्प बसतात, तिथे जान्हवीने इस्लामिक कट्टरवादावर थेट प्रहार केला आहे. तिला कोणाचीही भीती वाटली नाही, हे कौतुकास्पद आहे."
advertisement
9/11
काही युजर्सनी तर तिची तुलना इतर नेपो किड्सशी केली. एकाने लिहिलं,
काही युजर्सनी तर तिची तुलना इतर नेपो किड्सशी केली. एकाने लिहिलं, "ती केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर एक जागरूक नागरिक म्हणून बोलली आहे. बॉलिवूडमधील तथाकथित लिबरल गँग पेक्षा जान्हवीमध्ये जास्त हिंमत आहे."
advertisement
10/11
दिपू चंद्र दास याच्या हत्येनंतर बांगलादेश पोलिसांनी आतापर्यंत १२ संशयितांना अटक केली आहे. दिपूचे वडील रविलाल दास यांनी सोशल मीडियावरून आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

11/11
जान्हवी कपूरच्या या प्रतिक्रियेमुळे आता भारतीय सिनेसृष्टीतील इतर कलाकारही या विषयावर बोलणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement