TRENDING:

SMS स्वतःच सांगतो तो फ्रॉड आहे की नाही! शेवटच्या P, G, T, S मध्ये लपलंय मोठं रहस्य

Last Updated:

SMS Code: एसएमएसवर विविध लिंक पाठवून फसवणूक करण्याचं प्रमाण सध्या वाढलंय. पण थोडंस सतर्क राहिला तर तुमची फसवणूक कोणीच करू शकत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
SMS Code: डिजिटल युग सुरू झाल्याचे अनेक फायदे आहेत. मात्र याचे तोटेही आहेत. या युगात एसएमएसवर मोबाईल फोन यूझर्सला रोज अनेक अलर्ट येतात. यामध्ये बँक अलर्ट, ऑफर, ओटीपी किंवा सर्व्हिस अपडेटचा समावेश असतो. अनेकदा यातील मेसेज हे फ्रॉड असतात. ज्यामधील लिंकवर क्लिक केल्यास लाखोंची फसवणूक होऊ शकतं. पण थोडी हुशारी बाळगली तर तुमची फसवणूक टाळता येऊ शकते. कारण मेसेजच्या अखेरीस एक लहानसा अक्षर लिहिलेलं असतं, ते म्हणजे P, G, T  किंवा S. हे अक्षर उगाच लिहिलेले नसतात, तर यामागे एक खास अर्थ लपलेला असतो. याचा अर्थ समजून घेतला तर तुम्ही ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करू शकता.
एसएमएस कोड
एसएमएस कोड
advertisement

SMS च्या शेवटी लिहिलेल्या अक्षराचा अर्थ काय?

भारतात मेसेज पाठवण्याचेही काही नियम आहेत. ज्या अंतर्गत टेलिकॉम रेग्युलेटर कंपन्यांना SMS खास कॅटेगिरीमध्ये ठेवण्यास सांगतात. यामुळे सर्वच एसएमएसच्या शेवटी एक अक्षर लावलं जातं. ज्यावरुन कळतं की आपल्याला आलेला मेसेज हा कोणत्या प्रकारचा आहे.

फोनमध्ये नेटवर्क येत नाही का? 90% लोकांना माहितीच नसतं खरं कारण, लगेच घ्या जाणून

advertisement

G चा अर्थ काय?

एखाद्या SMS च्या अखेरीस G लिहिलेलं असेल तर, तो मेसेज एखाद्या सरकारी संस्थेकडून पाठवलाय. असे मेसेज हे सामान्यतः सरकारी योजना, सार्वजिन सुरक्षा किंवा नैसर्गिक आपत्तीशी संबंधित माहिती देण्यासाठी पाठवले जातात.

T चा अर्थ

एखाद्या मेसेजच्या अखेरीस T लिहिले असेल तर हा संदेश सामान्यतः ट्रांझेक्शनशी संबंधित असतो. असे एसएमएस हे बँक किंवा फायनेंशियल संस्था पाठवतात. ज्यामध्ये पेमेंटची माहिती, ओटीपी किंवा अकाउंटशी संबंधित अलर्टचा समावेश असतो.

advertisement

S चा अर्थ काय 

मेसेजच्या अखेरीस S दिसणे म्हणजे हा मेसेज सर्व्हिसशी संबंधित सूचना आहे. असे SMS अनेकदा कंपन्या किंवा ब्रांड पाठवतात. म्हणजेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जसं की, Amazon किंवा Flipkart आपल्या ऑर्डर अपडेट किंवा डिलिव्हरीशी संबंधीत माहिती असा मेसेजच्या माध्यमातून पाठवू शकते.

बदला फोनची फक्त एक सेटिंग! कधीच हॅक होणार नाही अकाउंट, पैसे राहतील सेफ

advertisement

P चा अर्थ 

तुम्ही SMS च्या अखेरीस P लिहिले असेल तर हा जाहिरात किंवा प्रमोशनल मेसेज असतो. यामध्ये कंपन्या आपले प्रोडक्ट, ऑफर किंवा सेवांचा प्रचार करतात. यात कपड्यांवर सूट, एज्युकेशनल लोन, कॉलेज अॅडमिशन किंवा एखाद्या नव्या स्किमची माहिती असते.

या अक्षरांवरुन तुम्ही ऑनलाइन फसवणुकीपासून कसा बचाव करू शकता

अक्षरांची ओळख करणे अनेकदा यूझर्ससाठी फायदेशीर ठरू शकते. सायबर एक्सपर्टनुसार अनेक बनावट किंवा स्कॅमचे मेसेज हे ही कॅटेगिरी फॉलो करत नाही. त्यांच्या मेसेजच्या अखेरीस यापैकी कोणतंही अक्षर नसतं. तसं तर कोणतंही अक्षर नसलेला प्रत्येक मेसेज फ्रॉड असेल असं नाही. पण तुम्ही असा मेसेज लक्ष देऊन पाहिला पाहिजे. अशा मेसेजवर लवकर विश्वास ठेवू नका.

advertisement

प्रमोशनल SMS कसे बंद करावे

तुम्ही वारंवार येणाऱ्या प्रमोशनल मेसेजपासून त्रस्त असाल, तर आपल्या टेलिकॉम ऑपरेटरच्या Do Not Disturb (DND) सुविधा अ‍ॅक्टिव्ह करू शकता.

जिओ यूझर्ससाठी

MyJio अ‍ॅप ओपन करा, मेन्यूमध्ये जा आणि सेटिंग्समध्ये जाऊन Do Not Disturb ऑप्शन ऑन करा. यानंतर आपल्या आवडीनुसार DND सेटिंग निवडू शकता.

एयरटेल आणि Vi यूझर्ससाठी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भीक मागून नव्हे, आम्ही कष्टाचं खातो; अंध दाम्पत्याचा खास बिझनेस, कमाई नको जिद्द बघा, Video
सर्व पहा

Airtel आणि Vodafone Idea चे यूझर्सही आपल्या संबंधित अ‍ॅप किंवा सर्व्हिसच्या माध्यमातून DND अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. असं केल्यानंतर नको असलेले प्रमोशनल SMS येणे हे बंद होईल.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
SMS स्वतःच सांगतो तो फ्रॉड आहे की नाही! शेवटच्या P, G, T, S मध्ये लपलंय मोठं रहस्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल