हॅकर्स मेंबरशिप एक्सपायर होण्याची भीती दाखवतात
सायबर सुरक्षेसाठी काम करणाऱ्या पालो अल्टोच्या युनिट 42 रिसर्च डिव्हिजनने या हॅकिंग मोहिमेची पुष्टी केली आहे. प्राइम मेंबरशिप संपण्याची भीती दाखवून हॅकर्स ॲमेझॉन युजर्सना टार्गेट करत असल्याचं या विभागाने म्हटलं आहे. ॲमेझॉनचे प्रतिनिधी म्हणून हॅकर्स यूझर्सना पीडीएफ डॉक्युमेंट पाठवत आहेत. ते यूझर्सना अकाउंट डेटा आणि क्रेडिट कार्ड डिटेल्स भरण्यास सांगतात. खरंतर हा फिशिंग हल्ला आहे. फॉर्म भरल्यानंतर कंपनीकडे जाण्याऐवजी हा डेटा हॅकर्सच्या हातात जातो. या हॅकर्सनी Amazon सारखी दिसणारी 1,000 हून अधिक डोमेन नावे नोंदवली आहेत, ज्यामुळे यूझर्सना अडकवणे सोपे होते.
advertisement
गुड न्यूज! Tata ची बंपर ऑफर, अर्ध्या किंमतीत मिळताय ब्रँडेड AC
अशा हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?
सध्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हॅकर्स आणि सायबर फसवणूक करणारे वेगवेगळ्या प्रकारे लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. असे हल्ले टाळण्यासाठी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही संशयित किंवा अनोळखी व्यक्तीकडून मिळालेली कोणतीही लिंक, मेसेज, ईमेल किंवा डॉक्यूमेंट उघडू नका. कोणी अज्ञात व्यक्ती तुम्हाला OTP, अकाउंट डिटेल्स किंवा इतर संवेदनशील माहिती विचारत असेल, तर ही माहिती त्याच्यासोबत शेअर करू नका. याशिवाय सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या आकर्षक जाहिराती आणि ऑफर्सपासूनही दूर राहा.