या महिलेला वॉशिंग मशीन दुरुस्त करण्यासाठी एक फॉर्म देण्यात आला. हा फॉर्म लिंक ओपन करुन भरायचा होता. मात्र त्याने या लिंकच्या सहाय्याने महिलेचा मोबाईल हॅक केला. मोबाईल हॅक करताच त्याने तब्बल 2 लाख 64 हजार रुपयांना महिलेला गंडा घातला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कसा घडला प्रकार?
advertisement
एका 28 वर्षिय गृहिणी कुटुंबासह सिडको परिसरात राहते. पती डॉक्टर आहेत. महिलेची वॉशिंग मशीन खराब झाली होती. महिलेने 12 सप्टेंबर रोजी सॅमसंग सर्व्हिसिंग सेटर नावाने हेल्पलाइन नंबर शोधला. या नंबरवर महिलेने संपर्क केला. या कॉलवरील व्यक्तीने महिलेला दुसऱ्या क्रमांकावरुन संपर्क साधला. फॉर्मसाठी लिंक पाठवली. रिपेअर सर्व्हिस अशी एपीके फाइल व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आली. कॉलवर असलेल्या व्यक्तीने 5 रुपये पाठवण्यास सांगितले. पण ते पैसे गेले नाही. त्यानंतर त्याने दुरुस्तीस आल्यानंतर पैसे देण्यास सांगितले.
WhatsApp हॅक झालंय? टेन्शन कसलं घेताय, या ट्रिकने दूर होईल प्रॉब्लम
कशी झाली फसवणूक
गुन्हेगारांनी पाठवलेली एपीके फाइल अधिकृत अॅप नव्हते. ते इंस्टॉल केल्याने मोबाईलचा गुन्हेगारांना रिमोट अॅक्सेस मिळतोय. त्यामुळे गुन्हेगारांना महिला मोबाईलमध्ये करत असलेली प्रत्येक गोष्टी टाइप करत असलेली अक्षरं दिसत होती. हेच पाहून त्याने बँक अकाउंट रिकामं केलं. महिलेला आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच बँकेशी संपर्क केला. त्यानंतर अकाउंट गोठवले.
घरात वापरण्यासाठी वाय-फाय कनेक्शन घ्यायचंय? जाणून घ्या किती स्पीड आवश्यक
फसवणूक कशी टाळावी?
- गुगल किंवा सर्च इंजिनवर मिळालेल्या नंबरवर अजिबात विश्वास ठेवू नका.
- प्रोडक्टच्या अधिकृत वेबसाइटवरुनच हेल्पलाइन नंबर किंवा ई-मेलआयडी वापरा.
- अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या लिंक किंवा फाइल्सवर क्लिक करु नका.
- कोणत्याही लिंकवर वैयक्तिक माहिती शेअर करु नका.