घरबसल्या मोबाईल नंबर अपडेट करा
मंत्रालयाने सोशल मीडियावर डिटेल्स देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये स्पष्ट केले आहे की तुमचा मोबाईल नंबर अपडेट केल्याने तुमच्या वाहन आणि परवान्याशी संबंधित महत्त्वाची माहिती वेळेवर मिळेल, फसवणूक किंवा इतर समस्या टाळता येतील. यामुळे आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज देखील दूर होते.
LCD की AMOLED, डोळ्यांसाठी कोणत्या डिस्प्लेचा फोन राहील बेस्ट? एकदा पाहाच
advertisement
तुमचा नंबर बदलण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या
तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन अपडेट करण्यासाठी, तुमच्याकडे काही विशिष्ट डिटेल्स असणे आवश्यक आहे. परिवहन किंवा सारथी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी, तुम्हाला वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन तारीख आणि चेसिस नंबर आवश्यक असेल. याव्यतिरिक्त, ड्रायव्हिंग लायसन्स (DL) नंबर आणि परवानाधारकाची जन्मतारीख. या आवश्यक माहितीशिवाय, तुमचा फॉर्म सबमिट केला जाणार नाही.
तुमच्या DL आणि RC वर तुमचा मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा?
परिवहन मंत्रालयाच्या (MoRTH) मते, तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे.
- प्रथम, तुम्हाला अधिकृत Parivahan Seva वेबसाइट (vahan.parivahan.gov.in किंवा sarathi.parivahan.gov.in) ला भेट द्यावी लागेल.
- प्रथम, तुम्हाला अधिकृत Parivahan Seva वेबसाइट (vahan.parivahan.gov.in किंवा sarathi.parivahan.gov.in) ला भेट द्यावी लागेल.
- वेबसाइट उघडल्यानंतर, तुमचा Mobile Number अपडेट करण्यासाठी तुम्हाला एक पॉप-अप विंडो दिसेल.
- तेथे दोन QR कोड देखील उपलब्ध असतील, जे स्कॅन केल्यास, तुम्हाला थेट पोर्टलवर घेऊन जातील.
- तुम्ही पोर्टलवर आल्यानंतर, तुम्हाला तुमच्या वाहनाची डिटेल्स भरावी लागेल.
- ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर, तुमचा नवीन फोन नंबर सिस्टममध्ये अपडेट केला जाईल.
- ऑनलाइन करू शकत नसाल, तर RTO कार्यालयात जा
फ्रिज कितीही चालवा येणार नाही जास्त वीज बिल! आजच करा हे काम, LG चा खुलासा
तुमचा मोबाइल नंबर तुमच्या DL आणि RCमध्ये ऑनलाइन अपडेट करण्यासाठी, तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा नसेल किंवा ऑनलाइन प्रक्रियेत अडचणी येत असतील, तर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर बदलण्यासाठी RTO कार्यालयात देखील जाऊ शकता.
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, तुमचा मोबाइल नंबर योग्यरित्या अपडेट केल्याने वाहन आणि परवान्याशी संबंधित महत्त्वाची माहिती वेळेवर मिळेल. हे वाहन मालक आणि चालकांना मोठी मदत करेल.