apple चा अपग्रेडेड A19 चिप नवीन आयफोन १७ मध्ये देण्यात आली आहे. हा सहा-कोर प्रोसेसर पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि डिव्हाइसवरील AI प्रक्रिया जलद करतो. कंपनीचा दावा आहे की, यामुळे मल्टीटास्किंग, गेमिंग आणि मशीन लर्निंग कार्ये अधिक सुरळीत होतील.
iPhone 17 आता पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली चार्जिंग सपोर्टसह येत आहे. अया फोनमध्ये १२-मेगापिक्सेल ऑप्टिकल दर्जाचा टेलिफोटो कॅमेरा आणि ४८-मेगापिक्सेलचा प्राथमिक फ्यूजन कॅमेरा आहे. कंपनीच्या मते, आयफोन १७ एका चार्जवर सुमारे ८ तास जास्त व्हिडिओ प्लेबॅक लाइफ देतो आणि जलद चार्जिंग सुविधा देखील आहे.
advertisement
iPhone 17 च्या सेल्फी कॅमेरामध्ये आता सेंटर स्टेज फीचर आहे. या फीचरच्या मदतीने, व्हिडिओ कॉल किंवा रेकॉर्डिंग दरम्यान कॅमेरा वापरकर्त्याला फ्रेमच्या मध्यभागी आपोआप ठेवतो, ज्यामुळे हालचाल असूनही स्पष्ट आणि स्थिर शॉट मिळतो.
iPhone 17 सिरीज आता 5 नवीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये लैव्हेंडर, मिस्ट ब्लू, ब्लॅक, व्हाइट आणि सेज रंगांचा समावेश आहे. तसेच, या डिव्हाइसेसना "सिरेमिक शील्ड २" देण्यात आले आहे, जे अॅपलच्या मते मागील मॉडेल्सपेक्षा तीन पट जास्त स्क्रॅच रेझिस्टंट बनवण्यात आले आहे.
apple चा नवीन iPhone 17 बेस मॉडेल 128 जीबी स्टोरेजसह ७९९ डॉलरमध्ये उपलब्ध असेल, तर iPhone air एअरची किंमत ८९९ डॉलरपासून सुरू होते. iPhone 17 pro आणि iPhone 17 pro max च्या सुरुवातीच्या किंमती अनुक्रमे १,०९९ डॉलर आणि १,१९९ डॉलर आहेत. भारतीय चलनामध्ये विचार केला तर,
iPhone 17 - जर तुम्ही आयफोन १७ घेण्याचा प्लॅन करत असाल तर 256 GB स्टोरेजमध्ये हा फोन उपलब्ध आहे. याची किंमत भारतात 82 हजारांपासून सुरू होईल. तर 512 GB स्टोरेज फोन घ्यायचा असेल तर 102900 रुपये किंमत असणार आहे.
apple ने आता सगळ्यात पातळ असा iphone air लाँच केला आहे. हा सगळ्यात स्लिम असा फोन आहे, आता स्लिम असेल म्हणून किंमतही तशीच आहे. या फोनची किंमत 256 GB साठी 1 लाख 19 हजार 900 रुपयांपासून सुरू होते, 512 GB ची किंमत 139900 रुपये इतकी आहे. तर 1 टीबीची किंमत 159900 रुपये इतकी आहे.
जर तुम्हाला आयफोन 17 pro max विकत घ्यायचा असेल तर जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवा. १ लाख ४९ हजार ९०० रुपये किंमत आहे. तर आयफोन १७ pro ची किंमत 1 लाख ३४ हजार ९०० रुपये आहे.
apple कंपनीने आयफोनसाठी आता Pre order सुद्धा सुरू केली आहे. 12 सप्टेंबरपासून ऑर्डर बूक करता येईल. त्यानंतर फोन हा 19 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे.
प्री-ऑर्डर शुक्रवारपासून सुरू होतील आणि डिव्हाइसेस १९ सप्टेंबरपासून उपलब्ध होतील.