TRENDING:

स्मार्ट टीव्ही वारंवार ऑन-ऑफ होतोय का? करा हे काम, प्रॉब्लम होईल दूर 

Last Updated:

कधीकधी, स्मार्ट टीव्हीमध्ये समस्या येतात. ज्यामुळे ते आपोआप चालू आणि बंद होतात. तुमच्या टीव्हीला ही समस्या येत असेल, तर ते सोडवण्यासाठी तुम्ही काही सोप्या स्टेप्स जाणून घेऊ शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : स्मार्ट टीव्ही आता फक्त मनोरंजनाचा स्रोत राहिलेले नाहीत. ते अनेक फीचर्स देतात. ज्यामुळे ते इतर कारणांसाठी देखील वापरले जाऊ शकतात. तसंच, कधीकधी त्यात समस्या येऊ शकतात आणि आपोआप चालू आणि बंद होऊ शकतात. तुमच्या स्मार्ट टीव्हीला ही समस्या येत असेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. ही मोठी समस्या नाही आणि काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही ही समस्या सोवडू शकता. चला या पद्धतीविषयी जाणून घेऊया.
स्मार्ट टीव्ही अपडेट्स
स्मार्ट टीव्ही अपडेट्स
advertisement

टीव्ही अनप्लग करा

तुमचा टीव्ही वारंवार चालू आणि बंद होत असेल, तर एक सोपा उपाय वापरून पहा. पॉवर आउटलेटमधून टीव्ही अनप्लग करा. नंतर, पॉवर बटण 10 सेकंद दाबा आणि धरून ठेवा आणि नंतर तो पुन्हा प्लग करा.

वाय-फाय वरून डिस्कनेक्ट करा

कधीकधी, स्मार्ट टीव्हीची स्मार्ट फीचर्स ही समस्या निर्माण करत असतात. जर तुमचा टीव्ही अलेक्सा, गुगल होम किंवा इतर स्मार्ट होम डिव्हाइसशी कनेक्ट केलेला असेल, तर तो डिस्कनेक्ट करा. या उपकरणांमधून ऑटोमेशनमुळे टीव्ही चालू आणि बंद होत असेल.

advertisement

Zoho Mail चे हे 5 फीचर्स ट्राय केल्यास Gmail विसरुन जाल! एकदा फायदे पाहाच

पॉवर टायमर चेक करा

बऱ्याच स्मार्ट टीव्हीमध्ये टायमर फीचर असते जे एका सेट वेळेवर टीव्ही बंद करते. तुमचा टीव्ही दररोज एका विशिष्ट वेळी बंद होत असेल, तर त्यात टायमर सेट असण्याची शक्यता असते. जर असे असेल, तर रिमोटने टायमर बंद करा.

advertisement

फर्मवेअर अपडेट करा

कधीकधी, सॉफ्टवेअर समस्येमुळे तुमचा टीव्ही आपोआप बंद होऊ शकतो. हे टाळण्यासाठी, त्याचे फर्मवेअर अपडेट करा. अनेक टीव्हीना मॅन्युअल अपडेटिंगची आवश्यकता असते. जर टीव्हीसाठी फर्मवेअर अपडेट उपलब्ध असेल, तर ते इंस्टॉल करा.

WhatsApp हॅक झालंय? टेन्शन कसलं घेताय, या ट्रिकने दूर होईल प्रॉब्लम

फॅक्टरी रीसेट हा देखील एक ऑप्शन आहे

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत अनारसे बिघडणार नाहीत! या टिप्स लक्षात ठेवा अन् खुसखशीत रेसिपी बनवा!
सर्व पहा

वरीलपैकी कोणत्याही पद्धतींनी टीव्हीची ऑन-ऑफ समस्या सुटली नाही, तर तुम्ही तो फॅक्टरी रीसेट करू शकता. लक्षात ठेवा, हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या टीव्ही खात्यात परत लॉग इन करावे लागेल.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
स्मार्ट टीव्ही वारंवार ऑन-ऑफ होतोय का? करा हे काम, प्रॉब्लम होईल दूर 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल