TRENDING:

Jio च्या नावाने येतोय फ्रॉड मेसेज! राहा सावध, अन्यथा बँक अकाउंट होईल रिकामं

Last Updated:

Jio Fake Message: घोटाळेबाज अनेकदा बँक कर्मचारी, पोलीस अधिकारी किंवा कोणत्याही सरकारी एजन्सीचे अधिकारी म्हणून स्वतःची ओळख सांगून लोकांना कॉल करतात आणि त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. पण, आता घोटाळेबाजांनी देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी जिओलाही सोडलेले नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Online Fraud: आजकाल ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. घोटाळेबाज वेगवेगळ्या प्रकारे लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. घोटाळेबाज अनेकदा बँक कर्मचारी, पोलीस अधिकारी किंवा कोणत्याही सरकारी एजन्सीचे अधिकारी असल्याचे सांगून लोकांना कॉल करतात आणि त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. पण, आता घोटाळेबाजांनी देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी जिओलाही सोडलेले नाही. घोटाळेबाज Jio चे नाव वापरून लोकांना बनावट मेसेज पाठवत आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
जिओ फेक मेसेज
जिओ फेक मेसेज
advertisement

X वर पोस्ट केले

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सायबर दोस्तने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी Twitter म्हणून ओळखले जाणारे)वर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सायबर सुरक्षेच्या धोक्यांबाबत लोकांना जागरूक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोस्टमध्ये लोकांना जिओच्या नावाने येणाऱ्या फेक मेसेजपासून सावध राहण्यास सांगितले होते. पोस्टमध्ये लोकांना APK फाईल डाउनलोड करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे, कारण तुमचा मोबाइल फोन हॅक होऊन तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो.

advertisement

WhatsApp आणतेय नवं फीचर! मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा

पोस्टमध्ये काय म्हटले आहे

पोस्टमध्ये सायबर दोस्तने म्हटले आहे की "सावधान! "Jio internet speed #5G network connection.apk सारखी फाईल डाउनलोड करू नका. ही एक धोकादायक फाइल आहे जी तुमचा फोन हॅक करू शकते आणि तुमचा डेटा चोरू शकते. सुरक्षित राहण्यासाठी, फक्त अधिकृत ॲप स्टोअरमधून ॲप्स डाउनलोड करा."

advertisement

APK फाइल धोकादायक का आहे?

APK फाइलमध्ये धोकादायक मालवेअर लपलेले असू शकते, जे फाइलसह तुमच्या फोनवर शांतपणे डाउनलोड केले जाऊ शकते. मालवेअर इतर ॲप्सप्रमाणे होमस्क्रीनवर दिसत नाही आणि फोनमध्ये लपतो. त्यामुळे लोकांना याची माहिती नाही. पण, तो तुमचा पर्सनल डेटा चोरू शकतो, ज्याचा वापर करून तुम्ही फोन हॅक करू शकता.

advertisement

AI चॅटबॉटला चुकूनही विचारु नका हे 5 प्रश्न! अन्यथा खावी लागेल जेलची हवा

देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

जिओ ही देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. त्याचे देशभरात करोडो यूझर्स आहेत. जिओ त्याच्या उत्तम कनेक्टिव्हिटी आणि फास्ट इंटरनेटसाठी प्रसिद्ध आहे. जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली होती. लॉन्च झाल्यानंतर अनेकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio च्या नावाने येतोय फ्रॉड मेसेज! राहा सावध, अन्यथा बँक अकाउंट होईल रिकामं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल