Lenovo V14 हा विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट एंट्री-लेव्हल लॅपटॉप आहे. यात 13th जेन Intel i3-1315U प्रोसेसर आहे, जो सहा कोर आणि 4.5GHz पर्यंतचा वेग देतो. यात 14-इंच FHD अँटी-ग्लेअर डिस्प्ले (250 nits) आहे आणि त्याचे वजन फक्त 1.43 किलो आहे. दैनंदिन कामांसाठी आणि अभ्यासासाठी हा एक विश्वासार्ह आणि हलका पर्याय आहे. किंमत: ₹27,490
advertisement
PM मोदींनी केली BSNLच्या स्वदेशी 4G नेटवर्कचा शुभारंभ! लवकरच 5G सेवाही येणार
ASUS Vivobook 14 (14th Gen i5) - हा 16GB RAMआणि 512GB SSD असलेला मध्यम श्रेणीचा लॅपटॉप आहे. यात बॅकलिट कीबोर्ड आणि फिंगरप्रिंट रीडर देखील आहे. 1.4 किलो वजनाचा हा लॅपटॉप अशा विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे ज्यांना प्रोजेक्ट किंवा हेवी टॅक्स पूर्ण करायची आहेत. किंमत: ₹72,990
ASUS Vivobook 16 OLED - तुम्ही डिस्प्ले क्वालिटीला प्राधान्य दिले तर हा योग्य ऑप्शन आहे. यात 16-इंचाचा OLED FHD डिस्प्ले, 16:10 आस्पेक्ट रेशो आणि 300 निट्स ब्राइटनेस आहे. हा लॅपटॉप प्रेझेंटेशन आणि मल्टीमीडिया टास्कसाठी आदर्श आहे. किंमत: ₹56,990
Dell Inspiron 13 (Ultra 5 125H)- हा प्रीमियम लॅपटॉप अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना शक्तिशाली मशीनची आवश्यकता आहे. यात 13.3-इंचाचा QHD+ डिस्प्ले, AI-सक्षम Ultra 5 125Hप्रोसेसर, 16GB LPDDR5X RAM आणि 512GB SSD आहे. फक्त 1.24 किलो वजनाचा, तो हलका आणि वेगवान दोन्ही आहे. किंमत: ₹85,890
Xiaomiयूझर्ससाठी गुड न्यूज! मिळणार iPhoneचं फीचर, तुमच्या स्मार्टफोनमध्ये सपोर्ट करेल?
ASUS Zenbook A14 OLED (2025) - हा सर्वात पोर्टेबल ऑप्शनपैकी एक आहे, फक्त 0.9 किलो वजनाचा. यात प्रीमियम मेटल बिल्ड, OLED पॅनेल आणि उत्कृष्ट बॅटरी लाइफ आहे. वारंवार प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आदर्श आहे. किंमत: ₹83,990
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 विद्यार्थ्यांना बजेट-फ्रेंडली आणि हाय-परफॉर्मेंस असलेला लॅपटॉप निवडण्याची उत्तम संधी देते. तुम्हाला एंट्री-लेव्हल लॅपटॉप हवा असेल किंवा प्रीमियम मशीन, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे.