TRENDING:

नव्या वर्षात फोन घेण्याचा विचार करताय? Vivo आणि Oppo लाही मागे सारतील असे 5 फोन, किंमत फक्त...

Last Updated:

Low Budget Best phone: नव्या वर्षात फोन घेण्याचा विचार करत असाल तर हे पाच फोन बेस्ट आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देशात अनेक उत्तमोत्तम स्मार्टफोन्स बाजारात दाखल होत आहेत. 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या चांगल्या फोन्सबद्दल जाणून घेऊ या.
फाईल फोटो
फाईल फोटो
advertisement

सीएमएफ फोन 1 (CMF Phone 1)

या फोनचं डिझाइन उत्तम असून, त्यात ड्युएल कॅमेरा सेटअप आहे. या फोनला 50MP चा मेन कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर आहे. तसंच, 16MP चा सेल्फी कॅमेराही आहे. फोनला Dimensity 7300 प्रोसेसर आहे.

सॅमसंग गॅलॅक्सी ए15 ( Samsung Galaxy A15)

या फोनमध्ये दमदार कॅमेरा सेटअप आहे. त्याला 50MPचा मेन कॅमेरा आणि 5MPची अल्ट्रावाइड लेन्स आहे. फोनमध्ये 2MPची मॅक्रो लेन्सदेखील आहे. तसंच, 13MPचा सेल्फी कॅमेरादेखील आहे. फोनमध्ये Dimensity 6100+ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनला 5000mAhची बॅटरी असून, त्याची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

advertisement

पोको एम 7 प्रो फाइव्ह जी (POCO M7 Pro 5G)

हा स्मार्टफोन अलीकडेच भारतात 13,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युएल कॅमेरा सेटअप आहे. 50MP चा मेन कॅमेरा आणि 2MPचा डेप्थ कॅमेरा त्यात आहे. 20MP चा सेल्फी कॅमेरादेखील आहे. फोनला MediaTek Dimensity 7025 Ultra Processor आहे. या फोनमध्ये 5110mAh क्षमतेची बॅटरी असून, ती 45W फास्ट चार्जिंगसह येते.

advertisement

रेडमी नोट 13 फाइव्ह जी (Redmi Note 13 5G)

या फोनला 6.67 इंच आकाराचा 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे. फोनला Dimensity 6080 चिपसेट असून, 108MPचा मेन कॅमेरा, 8MPची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MPचा डेप्थ कॅमेरादेखील आहे. या फोनचं 128GB स्टोरेज मॉडेल 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

मोटोरोला जी 64 फाइव्ह जी (Motorola G64 5G)

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

मोटोरोलाच्या या फोनमध्ये Dimensity 7025 प्रोसेसर आहे. फ्लिपकार्टवरून तो 12,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या फोनला 6.5 इंच आकाराचा FHD+ डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनला 50MPचा मेन कॅमेरा, 8MPचा अल्ट्रावाइड कॅमेरा असून, 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
नव्या वर्षात फोन घेण्याचा विचार करताय? Vivo आणि Oppo लाही मागे सारतील असे 5 फोन, किंमत फक्त...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल