OnePlus चे दमदार फोन्स : OnePlus जानेवारी महिन्यात त्यांचे नवीन फ्लॅगशिप फोन्स भारतीय बाजारात आणणार आहे. OnePlus 13 आणि 13R हे 7 जानेवारीला भारतात लाँच होणार आहेत, म्हणजे अगदी काही दिवसात. OnePlus ने हा फोन चीनमध्ये आधीच सादर केला आहे, त्यामुळे या फोनबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. हा फोन OxygenOS 15 सोबत आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असेल.
advertisement
OnePlus 13 आता कमी कर्व्ही दिसतो, कारण त्याला आता फ्लॅट फ्रेम आहे. कॅमेरा मॉड्यूल आता कडेपासून दूर आहे आणि तिथे एक मेटल पट्टी आहे, ज्यावर Hasselblad चं नवीन H लोगो दिसेल. कंपनीने डिस्प्ले X2 OLED पॅनलमध्ये अपग्रेड केला आहे, ज्यामध्ये अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट आणि नवीन अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनला IP69 रेटिंग देखील मिळालं आहे, ज्यामुळे तो पाण्याच्या उच्च दाबापासूनही सुरक्षित राहतो. यात Snapdragon 8 Elite चिपसेट, 24GB पर्यंत RAM आणि 1TB स्टोरेज आहे.
Xiaomi चे नवीन प्रोडक्ट्स : Redmi 14C आणि Xiaomi Pad 7 हे २०२५ मधील Xiaomi चे पहिले प्रोडक्ट्स असतील. नवीन स्वस्त 5G फोन ड्युअल-SIM 5G नेटवर्कला सपोर्ट करेल आणि त्यात 50MP चा रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. Xiaomi ने नुकताच Redmi A4 लाँच केला होता, आणि हा फोन त्याच श्रेणीतील आणखी एक स्वस्त 5G फोन असू शकतो.
Xiaomi पुढील महिन्यात Pad 7 टॅबलेट देखील भारतीय बाजारात आणणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना अँड्रॉइड टॅबलेटचे अधिक पर्याय मिळतील. हे प्रोडक्ट चीनमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे आणि तेच मॉडेल भारतीय बाजारातही येण्याची शक्यता आहे. हे डिव्हाईस 2024 मध्ये लाँच झालेल्या Pad 6 सिरीजसारखेच दिसण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy S25 सिरीज : Samsung देखील २०२५ मध्ये Galaxy S25 सिरीज लाँच करून फ्लॅगशिप स्पर्धेत उतरणार आहे. जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये काही महत्त्वाची प्रोडक्ट्स लाँच होणार आहेत. कंपनी AI च्या स्पर्धेत जोरदार प्रयत्न करत आहे आणि प्रीमियम Galaxy S25 आणि S25 Ultra मॉडेल या प्रयत्नांचे नेतृत्व करतील.
Poco X7 सिरीज : Poco ९ जानेवारीला त्यांची पॉवरफुल X-सिरीज लाँच करत आहे, ज्याची घोषणा कंपनीने अधिकृतपणे केली आहे. Poco X7 सिरीज लोकांना विशेष आकर्षित करेल, कारण या सिरीजचा फोकस परफॉर्मेंस आणि किंमत यावर असतो आणि X6 सिरीजच्या यशानंतर या सिरीजकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. X7 आणि X7 Pro मॉडेल बाजारात येऊ शकतात.
हे ही वाचा : थंडीत रोगप्रतिकारकशक्ती कशी वाढवायची? डाॅक्टरांनी दिल्या या 4 महत्त्वाच्या टिप्स, जाणून घ्या
हे ही वाचा : 2025 मध्ये ध्यान करणाऱ्यांची संख्या वाढेल! मानवी जीवनात ‘ध्यान’ किती गरजेचं?