TRENDING:

सेफ्टीसाठी फोनला बॅक कव्हर घालताय? तोच ठरेल धोक्याचा, मोबाईल होईल खराब

Last Updated:

मोबाइल सुरक्षित ठेवणाऱ्या फोन कव्हरमुळे खासकरून उन्हाळ्यात अनेक प्रकारचे नुकसानही होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : मोबाईल फोन लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. व्हॉट्सॲप डीपी किंवा फेसबुक पोस्टवर नवीन आणि महागडा फोन खरेदी केल्याचे स्टेटस लोक ठेवतात. पण महागडा फोन घेतल्यावर त्याच्या सुरक्षेची चिंता असते, त्यामुळे लोक लगेचच चांगले दिसणारे फोन कव्हर शोधू लागतात. फोन जितका महाग असेल तितके जाड आणि सुरक्षित कव्हर घेतले जाते. या कव्हरमुळे फोन फुटण्यापासून आणि स्क्रॅचपासून सुरक्षित राहतो. पण हे फोन कव्हर उन्हाळ्यात मोबाईलसाठी घातक ठरू शकतात.
News18
News18
advertisement

मोबाइल सुरक्षित ठेवणाऱ्या फोन कव्हरमुळे खासकरून उन्हाळ्यात अनेक प्रकारचे नुकसानही होते. तुमच्या फोनचे कव्हर जितकं जाड असेल तितकं फोनचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे उन्हाळ्यात फोनची विशेष काळजी घ्यावी लागते.

फोन गरम होऊन हँग होईल

मोबाईलवर कव्हर लावल्याने फोन सगळीकडून सील होतो. त्यामळे हवेचा प्रवाह थांबतो आणि फोन लवकर गरम होऊ लागतो. उन्हाळ्यात फोन खूप तापतो, ज्यामुळे नवीन मोबाईलही हँग होतो. याशिवाय काही फोनमध्ये चार्जिंगची समस्या येते आणि चार्जिंगचा स्पीड कमी होतो.

advertisement

नेटवर्कमध्ये समस्‍या

मोबाईलचं कव्हर जाड असल्याने हँगिंग आणि ओव्हरहीटिंगची समस्या होते, शिवाय सेन्सरच्या कव्हरमुळे तुम्हाला नेटवर्कची समस्याही जाणवू लागते. नेटवर्क नीट नसेल तर कॉल करण्यात आणि डेटा वापरण्यात अडचणी येतात. फोन गरम झाल्यास आपण तुम्ही कानाजवळ ठेवून जास्त वेळ बोलू शकणार नाही आणि व्हिडिओ इत्यादी पाहण्यात समस्या येईल कारण डेटाचा स्पीड कमी होईल.

advertisement

बॅटरीवर होईल परिणाम

तुमचा फोन गरम झाल्यास त्याचा बॅटरीच्या क्षमतेवरही परिणाम होतो. फोन गरम केल्याने बॅटरीच्या चार्जिंगवर परिणाम होईल आणि हळूहळू तुमच्या फोनची बॅटरी कमकुवत होईल. कव्हर चांगल्या क्वालिटीचं नसल्यास त्यावर बॅक्टेरिया जमा होतात आणि ते तुम्हाला व फोनच्या सेन्सर्सलाही नुकसान पोहोचवू शकतात.

स्‍पीकर होईल खराब

फोनला कव्हर असलं की तुम्ही वेळोवळी ते साफ करू शकत नाही. त्यामुळे फोनच्या स्पीकरवर घाण साचू लागते आणि एक वेळ अशी येते की स्पीकर घाणीमुळे बंद होतो. आवाजही कमी होतो.. स्पीकर ग्रील आणि बॅक पॅनलच्या काचेवर घाण साचल्यामुळे कॉल करणं आणि व्हिडिओ पाहण्यात अडचणी येतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

फोनला पातळ कव्हर लावा जेणेकरून हवेचा प्रवाह मोबाईलमध्ये राहील.

मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
सेफ्टीसाठी फोनला बॅक कव्हर घालताय? तोच ठरेल धोक्याचा, मोबाईल होईल खराब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल