TRENDING:

फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉननंतर सॅमसंगनेही लावला सेल! अर्ध्या किंमतीत मिळतील हे 14 फोन

Last Updated:

Samsung Fab Grab Fest 2025 सुरू झाला आहे. या सेलमध्ये 14 गॅलेक्सी फोन, Galaxy Watch 8, Galaxy Buds 3 Pro सारख्या प्रोडक्टवर 51% पर्यंत डिस्काउंट दिलं जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सॅमसंगने भारतात फॅब ग्रॅब फेस्ट 2025 लाँच केला आहे. या फेस्टिव्ह सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, होम अप्लायन्सेस आणि मॉनिटर्सवर लक्षणीय सूट देण्यात आली आहे. अलीकडील जीएसटी बदलांमुळे, एअर कंडिशनर, स्मार्ट टीव्ही आणि मॉनिटर्सच्या सुधारित कमी किमती देखील सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केल्या आहेत. हा सेल भारतात अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2025 च्या सेलसोबत आहे. याचा अर्थ ग्राहकांना अनेक प्लॅटफॉर्मवर उत्तम डील आणि बँक ऑफर्सचा फायदा होत आहे.
सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट
सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट
advertisement

सॅमसंगच्या फेस्टिव्ह सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर लक्षणीय सूट देण्यात येत आहे. या सेलमध्ये Galaxy Z Fold 7, Galaxy Z Flip 7, Galaxy S25 Ultra, Galaxy S25, Galaxy S25 Edge, Galaxy S24 Ultra, Galaxy S24, Galaxy S24 FE, Galaxy A56, Galaxy A55, Galaxy A36, Galaxy A35, Galaxy A26 आणि Galaxy A17 वर 53% पर्यंत सूट देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. याचा अर्थ असा की ऑफर अंतर्गत हे फोन जवळजवळ निम्म्या किमतीत घरी आणता येतील. खरेदीदारांना ₹12,000 पर्यंतची त्वरित बँक सूट देखील मिळू शकते.

advertisement

Samsung Galaxy Laptops वर सूट

Samsung Galaxy Book 5 Pro 360, Galaxy Book 5 Pro, Galaxy Book 5 360, Galaxy Book 5 आणि Galaxy Book 4 सिरीजवर 59% पर्यंत सूट आणि ₹17,490 पर्यंतची इंस्टेंट बँक डिस्काउंट उपलब्ध आहे.

Amazon सेलमध्ये ₹35 हजारांहून कमीमध्ये मिळतोय पॉवरफू लॅपटॉप! मॅकबुकही स्वस्त

एवढेच नाही तर सेलमध्ये टॅब्लेटवरही सूट मिळेल. या सेलमध्ये Galaxy Tab S11 Ultra, Galaxy Tab S11, Galaxy Tab S10 FE+, Galaxy Tab S10 FE, Galaxy Tab S10 Lite, Galaxy Tab S9 FE+, Galaxy Tab A11+ आणि Galaxy Tab A11 वर 50% पर्यंत सूट दिली जात आहे, तसेच 20,000 रुपयांपर्यंतची इंस्टंट बँक सूट देखील दिली जात आहे.

advertisement

Iphone चा नवीन अपडेट iOS 26 मुळे खरंच फोन स्लो होतोय? बॅटरीही उतरते? मग तो अपडेट करायचा की नाही?

सॅमसंगचे म्हणणे आहे की फॅब ग्रॅब फेस्ट 2025 दरम्यान, ग्राहक प्रीमियम डिव्हाइसेस सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकतात. बँक डिस्काउंट, कॅशबॅक आणि फ्लेक्सिबल EMI योजना या उत्सवाच्या हंगामातील सर्वात मोठ्या डीलपैकी एक आहेत.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉननंतर सॅमसंगनेही लावला सेल! अर्ध्या किंमतीत मिळतील हे 14 फोन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल