TRENDING:

Samsung S25 सीरीज लॉन्चपूर्वी 'हा' फोन मिळतोय अर्ध्या किंमतीत, फीचर्स आहेत जबरदस्त

Last Updated:

Samsung S23 Price Drop: सॅमसंग पुढच्या वर्षी 22 जानेवारीला आपली नवीन Samsung S25 सीरीज लॉन्च करू शकते, त्याआधी कंपनी Galaxy S23 वर प्रचंड सूट देत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Samsung S23 Price Drop: Samsung च्या नवीन Galaxy S25 सिरीज लाँच होण्यासाठी फक्त काही आठवडे शिल्लक आहेत. दरम्यान Galaxy S23, जो जवळपास दोन वर्षे जुना स्मार्टफोन आहे, सध्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. तुम्ही Galaxy S23 आता फक्त 37,999 रुपयांमध्ये मध्ये खरेदी करू शकता. जे त्याच्या लॉन्च किमतीपेक्षा 50 टक्के कमी आहे, विशेषत: चांगले आणि कॉम्पॅक्ट Android फ्लॅगशिप डिव्हाइस शोधत असलेल्यांसाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे. या डिव्हाइसविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया.
सॅमसंग
सॅमसंग
advertisement

स्वस्त किमतीत फ्लॅगशिप मजा

6.1-इंच स्क्रीनचा कॉम्पॅक्ट आकार असूनही, Galaxy S23 Galaxy S24 किंवा इतर कोणत्याही Android फ्लॅगशिप स्मार्टफोनइतका शक्तिशाली आहे. ज्याची किंमत 50,000 रुपयांपेक्षा आहेत. यात प्रीमियम मेटल-ग्लास-सँडविच बिल्ड, पाणी आणि धूळ संरक्षणासाठी IP68 रेटिंग, विशेष टेलिफोटो आणि अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. एवढेच नाही तर गॅलेक्सी एआयचे सर्व फीचर्स या फोनमध्ये उपलब्ध आहेत जे लेटेस्ट सीरिजमध्येही उपलब्ध आहेत.

advertisement

Nothing Phone यूझर्सला मिळालं न्यू ईयर गिफ्ट! फोनमध्ये आलंय खास फीचर

लेटेस्ट फ्लॅगशिपची अनेक वैशिष्ट्ये

एवढेच नाही तर Galaxy S23 मध्ये वायरलेस चार्जिंग, eSIM सपोर्ट आणि अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सरसह 120Hz डिस्प्ले यासह फ्लॅगशिप Android स्मार्टफोनची अनेक फीचर्स आहेत. डिव्हाइसची डिझाइन अगदी स्वच्छ आहे. फोनला पॉवर करण्यासाठी, त्यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेट वापरला गेला आहे, जो किमान 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतो.

advertisement

6000 पेक्षा कमी किंमतीत येतोय भारी स्मार्टफोन, अ‍ॅमेझॉनवर झालाय लिस्ट

बॅटरी देखील खूप दमदार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

हा स्वस्त फोन देखील हेवी मल्टीटास्किंग आणि गेमिंग कोणत्याही समस्येशिवाय हाताळू शकतो. याशिवाय, डिव्हाइसमध्ये Android 14-बेस्ड OneUI 6 दिसत आहे आणि लवकरच यात Android 15-बेस्ड OneUI 7 चे अपडेट येत आहे. डिव्हाइसमध्ये 3,900 mAh बॅटरी आहे आणि 25W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे, ज्यामुळे फोन संपूर्ण दिवस चालू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Samsung S25 सीरीज लॉन्चपूर्वी 'हा' फोन मिळतोय अर्ध्या किंमतीत, फीचर्स आहेत जबरदस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल