6000 पेक्षा कमी किंमतीत येतोय भारी स्मार्टफोन, अॅमेझॉनवर झालाय लिस्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
itel Zeno 10 Launch Date: itel Zeno 10 स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट Amazon वर लिस्ट करण्यात आला आहे. तसेच, एक डेडिकेटेड मायक्रोसाइट ॲमेझॉनवर थेट करण्यात आली आहे.
itel Zeno 10 Launch Date: 2025 च्या सुरुवातीला अनेक स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. यामध्ये itel Zeno 10 चा समावेश आहे. सहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट ॲमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. तसेच, एक डेडिकेटेड मायक्रोसाइट ॲमेझॉनवर लाइव्ह करण्यात आला आहे. लिस्टिंगसोबतच स्मार्टफोनच्या डिझाईन आणि फीचर्सचीही माहिती समोर आली आहे. itel Zeno 10 च्या किंमती आणि फीचर्स संबंधित प्रत्येक डिटेल्स जाणून घेऊया.
itel Zeno 10 Launch Date: 2025 मध्ये लॉन्च होणार स्मार्टफोन, 6.7 इंच डिस्प्ले
मायक्रोसाइटनुसार, itel Zeno 10 2025 मध्ये लॉन्च होईल. तसंच, लॉन्चची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. या फोनची किंमत सहा हजार रुपयांपेक्षा कमी असेल. itel च्या A सीरीज पोर्टफोलिओ अंतर्गत येत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 120Hz चे रिफ्रेश रेट डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. यासोबतच फोनमध्ये 6.7 इंचाचा पंच होल डिस्प्ले आणि स्लीक डायनॅमिक बार देखील दिला जाऊ शकतो. ज्या यूझर्सला बेस्ट व्यूइंग एक्सपीरियन्स हवा आहे, ते सर्व फीचर्स यामध्ये उपलब्ध असतील.
advertisement
itel Zeno 10 Launch Date: स्मार्टफोन तीन वर्षे लॅगशिवाय चालेल
itel Zeno 10 फोनमध्ये "3 Year Fluency" फीचर देखील दिले जाऊ शकते. ज्यामुळे फोन 3 वर्षे लॅगशिवाय चालेल. त्याची स्पीड आणि परफॉर्मेंस नेहमी सारखेच राहतील. ज्यामुळे ते मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी परफेक्ट होईल. आयफोन सारखे डायनॅमिक आयलंड सारखे फीचर देखील स्मार्टफोनमध्ये पाहता येणार आहे. कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी कॅमेरासाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच डिझाइन असेल.
advertisement
TRENDING NOW
नवीन itel स्मार्टफोन 128 GB मेमरीसह अनेक कलर्समध्ये उपलब्ध असेल. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. मायक्रोसाइटनुसार हा स्मार्टफोन काळ्या, लाल आणि पांढऱ्या रंगाच्या व्हेरिएंटमध्ये येईल. लॉन्च केल्यावर लगेच तुम्ही Amazon वर खरेदी करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2024 3:36 PM IST







