Nothing Phone यूझर्सला मिळालं न्यू ईयर गिफ्ट! फोनमध्ये आलंय खास फीचर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Nothing OS 3.0 Android 15 Update: तुम्ही नथिंग फोन यूझर असाल तर आता तुम्हाला फोनमध्ये एक खास फीचर मिळेल. कंपनीने आपल्या स्मार्टफोन्ससाठी सर्कल टू सर्च फीचर जारी केले आहे. हे फीचर Android 15 वर बेस्ड Nothing OS 3.0 अपडेटमध्ये उपलब्ध असेल. कंपनीने लेटेस्ट अपडेट आणले आहे, जे हळूहळू सर्व यूझर्सपर्यंत पोहोचत आहे.
Nothing OS 3.0 Android 15 Update: तुम्ही नथिंग फोन यूझर असाल तर आता तुम्हाला फोनमध्ये एक खास फीचर मिळेल. कंपनीने आपल्या स्मार्टफोन्ससाठी सर्कल टू सर्च फीचर जारी केले आहे. हे फीचर Android 15 वर बेस्ड Nothing OS 3.0 अपडेटमध्ये उपलब्ध असेल. कंपनीने लेटेस्ट अपडेट आणले आहे, जे हळूहळू सर्व यूझर्सपर्यंत पोहोचत आहे.
Nothing ने त्याच्या स्मार्टफोनसाठी लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट जारी केले आहे. कंपनीने मागील आठवड्यातच Android 15 वर बेस्ड Nothing OS 3.0 रोलआउट केले आहे. या अपडेटमध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत, जे आतापर्यंत काही फ्लॅगशिप अँड्रॉइड फोन्समध्ये उपलब्ध होते.
advertisement
आज आपण सर्किल टू सर्च सारख्या फीचर्सविषयी बोलत आहोत. Nothing Phone 2, Phone 2a आणि Phone 2a Plus साठी ब्रँडने नवीन अपडेट जारी केलेय. सर्किल टू सर्च फीचर यावर्षाच्या सुरुवातीला Galaxy S24 सीरीजसोबत इंट्रोड्यूस करण्यात आला होता.
नथिंगच्या फोनमध्ये सर्कल टू सर्च उपलब्ध असेल
आधीच सांगितल्या प्रमाणे, हे फीचर Nothing Phone 2, Phone 2a आणि Phone 2a Plus मध्ये उपलब्ध असेल. जेथे Phone 2 आणि Phone 2a यूझर्सला लेटेस्ट सॉफ्टवेअरचा स्टेबल व्हर्जन मिळेल. तर Phone 2a Plus यूझर्सना Nothing OS 3.0 चे बीटा अपडेट मिळेल.
advertisement
याशिवाय नथिंगच्या इतर फोनवर हे फीचर अपडेट केले जाणार नाही. कंपनीने यावर्षी बजेट रेंजमध्ये CMF फोन 1 लॉन्च केला आहे. परंतु सध्या या फोनमध्ये हे फीचर उपलब्ध नाही.
तुम्ही हे फीचर कसे वापरू शकता?
- सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोन योग्य बिल्ड नंबरवर काम करत आहे याकडे लक्ष द्यावे लागेल. हे फीचर काम करण्यासाठी, फोन 2 वर Pong-V3.0-241207-0124, फोन 2a वर Pacman-V3.0-241210-2057, फोन 2a Plus वर PacmanPro-V3.0-241126-1448 हे बिल्ड असावे.
advertisement
फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही हे चेक करु शकता. यासाठी तुम्हाला Settings, नंतर About Phone, Software वर जावे लागेल. येथे तुम्हाला बिल्ड नंबरचा ऑप्शन मिळेल. एकदा तुमचे डिव्हाइस अपडेट झाले की, तुम्हाला सेटिंग्जवर परत जावे लागेल.
येथे तुम्हाला स्पेशल फीचर्स > गेस्चर्स > नेव्हिगेशन मोड > सर्कल टू सर्च वर क्लिक करावे लागेल. अपडेट केल्यानंतरही तुम्हाला हे फीचर मिळत नसेल तर तुम्हाला फोन रिबूट करावा लागेल. हे फीचर दिसत असल्यास, तुम्ही होम बटण दीर्घकाळ दाबून किंवा नेव्हिगेशन बार दाबून ते अॅक्टिव्ह करू शकता.
advertisement
यानंतर, तुम्हाला जे काही शोधायचे आहे ते सर्कल करावे लागेल आणि काम होईल. गुगल तुम्हाला सर्कल केलेल्या वस्तूबद्दल इंटरनेटवर उपलब्ध माहिती देईल. हे फीचर त्याच्या इतर डिव्हाइसेसवर उपलब्ध असेल की नाही याची सध्या काहीही पुष्टी झालेली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2024 5:05 PM IST







