TRENDING:

महागड्या स्मार्टफोन्सला स्क्रीन गार्ड लावताय? मग या गोष्टी अवश्य ठेवा लक्षात

Last Updated:

स्क्रीन हा कोणत्याही स्मार्टफोनचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. बहुतेक लोक स्क्रीनच्या सुरक्षेसाठी स्क्रीन गार्ड बसवतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही स्क्रीन गार्ड खरेदी करताना निष्काळजी राहिल्यास ते तुमचे मोठे नुकसान करू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपला स्मार्टफोन आता एक गॅझेट बनला आहे. जो अनेक दैनंदिन कामांमध्ये वापरला जातो. स्मार्टफोन किंवा मोबाईल फोन आता फक्त कॉलिंग आणि मेसेजिंगपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ऑनलाइन पेमेंट असो, ऑनलाइन शॉपिंग असो किंवा मनोरंजन असो, स्मार्टफोनचा वापर जवळपास सर्वच कामांसाठी केला जातो. स्मार्टफोनची स्क्रीन हा त्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे, जर तो खराब झाला तर मोठा त्रास होऊ शकतो.
स्क्रीन गार्ड
स्क्रीन गार्ड
advertisement

स्मार्टफोन खरेदी करताना, सुमारे 99.9 टक्के लोक प्रथम त्यांच्या फोनच्या डिस्प्लेमध्ये टेम्पर्ड ग्लास म्हणजेच स्क्रीन गार्ड बसवतात. कदाचित तुम्हीही असेच केले असेल. पण, तुम्हाला माहीत आहे का की, जर तुम्ही टेम्पर्ड ग्लास बसवण्यात थोडेसेही निष्काळजी राहिलो तर त्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

Black Friday सेलसाठी Appleची ऑफर्सची घोषणा! पाहा कशावर किती डिस्काउंट

advertisement

लोक अनेकदा स्क्रीन गार्ड बसवतात कारण फोनची स्क्रीन स्क्रॅच होत नाही आणि झीज होण्यापासून फोन सुरक्षित राहतो. परंतु ते महाग स्मार्टफोनला जंकमध्ये बदलू शकते. त्यामुळे, तुमच्या स्मार्टफोनसाठी योग्य स्क्रीनगार्ड निवडणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. स्मार्टफोनसाठी स्क्रीनगार्ड खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत चला जाणून घेऊया.

स्क्रीन टच सेंसिव्हिटी

स्मार्टफोनमधील प्रत्येक कामासाठी स्क्रीनला टच करणे आवश्यक आहे. फोनचा स्क्रीन हा सर्वात जास्त वापरला जाणारा भाग आहे. त्यामुळे त्याची सेन्सिव्हिटी लक्षात घेतली पाहिजे. अनेक स्थानिक कंपन्याही बाजारात टेम्पर्ड ग्लास उपलब्ध करून देत आहेत. जर तुम्ही कमी दर्जाचे स्क्रीन गार्ड स्वस्तात विकत घेतले तर ते तुमच्या स्क्रीनची टच सेन्सिव्हिटी कमी करू शकते आणि या फ्यूजरमुळे तुम्हाला फोन चालवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

advertisement

WhatsApp आणतंय नवं फीचर! ग्रुप चॅट स्टेटसमध्ये मेंशन करु शकतील यूझर

स्क्रीनवर कोणतेही बबल्स नसावेत

स्क्रीनगार्ड लावताना अनेक वेळा स्क्रीनवर बबल दिसतात. स्क्रीनगार्ड लावताना फोन स्क्रीनवर बबल दिसला तर स्मार्टफोन खूप खराब दिसू लागतो. एकदा स्क्रीनवर बबल दिसू लागले की, टेम्पर्ड ग्लास लावल्यानंतर ते कधीच जात नाहीत, त्यामुळे ते लावताना हे लक्षात ठेवा.

advertisement

हार्ड स्क्रीन गार्ड वापरू नका

बाजारात अनेक प्रकारचे स्क्रीन गार्ड उपलब्ध आहेत. तुमच्या बजेटनुसार तुम्ही कोणताही स्क्रीन गार्ड खरेदी करू शकता. परंतु, काहीवेळा दुकानदार खूप जाड स्क्रीन गार्ड लावतात जे फोन स्क्रीनसाठी चांगले मानले जात नाहीत. जाड स्क्रीन गार्ड स्क्रीनपेक्षा खूप वेगळा दिसतो आणि कोणताही दबाव किंवा धक्का सहन करण्यास पुरेशी फ्लेक्सिबिलिटी नसते. खूप जाड असलेले स्क्रीन गार्ड देखील तुटण्याची शक्यता जास्त असते.

advertisement

प्रायव्हसी स्क्रीन गार्ड वापरा

तुम्हाला दोन प्रकारचे स्क्रीन गार्ड बाजारात मिळतील. एक म्हणजे नॉर्मल स्क्रीन गार्ड आणि दुसरा प्रायव्हसी स्क्रीन गार्ड. तुम्हाला तुमच्या कंटेंट किंवा डेटाची प्रायव्हसी हवी असल्यास, प्रायव्हसी स्क्रीन गार्ड खरेदी करा. प्रायव्हसी स्क्रीन गार्ड डार्क मोड फीचरसह येतात. तुम्ही ते वापरल्यास, तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीलाही तुमच्या फोनच्या स्क्रीनवर काय चालले आहे ते पाहता येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित करू शकता.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
महागड्या स्मार्टफोन्सला स्क्रीन गार्ड लावताय? मग या गोष्टी अवश्य ठेवा लक्षात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल