WhatsApp आणतंय नवं फीचर! ग्रुप चॅट स्टेटसमध्ये मेंशन करु शकतील यूझर

Last Updated:

WhatsApp Group Chat Mention Feature: ग्रुप चॅटमध्ये कम्युनिकेशन सुलभ करण्यासाठी व्हॉट्सॲप एक नवीन फीचर आणत आहे. त्याच्या मदतीने यूझर्स त्यांच्या स्टेटसमध्ये ग्रुप चॅट्सचा उल्लेख करू शकतील.

व्हॉट्सअॅप
व्हॉट्सअॅप
मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ग्रुप चॅटमध्ये कम्युनिकेशन सुलभ करण्यासाठी एक नवीन फीचर आणत आहे. त्याच्या मदतीने युजर्स त्यांच्या स्टेटसमध्ये ग्रुप चॅट्सचा उल्लेख करू शकतील. हे मोठ्या आणि अॅक्टिव्ह ग्रुपमध्ये कोऑर्डिनेशन आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ करेल. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
WhatsApp नवीन फीचर्सवर काम करत आहे
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp स्टेटस अपडेट्समध्ये ग्रुप चॅट्सचा उल्लेख करण्याच्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरसह, यूझर्स त्यांच्या स्टेटस अपडेटमध्ये विशिष्ट कॉन्टॅक्ट्सला डायरेक्टली नोटिफाय करु शकतील. यामुळे त्यांना टार्गेटेड ऑडियन्ससोबत एंगेज करणे सोपे करेल. जेव्हा एखाद्या संपर्काचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यांना त्यांच्या चॅटमध्ये एक नोटिफिकेशन आणि एक मेसेज प्राप्त होतो ज्यात त्यांना मेंशनविषयी माहिती मिळते.
advertisement
यापूर्वी ग्रुप चॅटच्या सदस्यांना सूचित करण्यात काही मर्यादा होत्या. यूझर्स स्टेटस अपडेटमध्ये फक्त पाच कॉन्टॅक्ट्सलाच मेंशन करु शकत होते. परंतु, नवीन फीचर यूझर्सना त्यांच्या स्टेटसमध्ये संपूर्ण ग्रुप चॅटला डायरेक्टली मेंशन करण्याची सुविधा देते.
advertisement
यूझर्ससाठी सोय
ग्रुप चॅटला मेंशन करून यूझर्स सर्व सदस्यांना अनाउंसमेंट, इव्हेंट किंवा शेअर केलेल्या कंटेंटविषयी कळवू शकतात. यासाठी त्यांनी सर्वांना पर्सनली मेसेज देण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळेची बचत होते आणि सर्व ग्रुप मेंबर्सला एकाच वेळी कळेल.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp आणतंय नवं फीचर! ग्रुप चॅट स्टेटसमध्ये मेंशन करु शकतील यूझर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement