सतत पॉप-अप जाहिराती
फोनवर पॉप-अप जाहिराती सतत दिसत असतील आणि त्या स्क्रीनवरून काढून टाकणे कठीण असेल तर ते मालवेअरमुळे असू शकते. या जाहिरातींवर क्लिक केल्यास फोनमध्ये असलेली पर्सनल माहिती चुकीच्या हातात पडू शकते.
BSNL ची बंपर ऑफर! महिनाभरासाठी देतेय Free इंटरनेट, लगेच घ्या फायदा
कोणत्याही कारणाशिवाय बिलात वाढ
कोणतीही अतिरिक्त सेवा न घेता तुमच्या फोनचे बिल वाढले असेल, तर तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. क्रॅमिंगमुळे अनेक वेळा बिल वाढते. क्रॅमिंग म्हणजे थर्ड पार्टी कंपनी तुमच्याकडून अशा सेवेसाठी शुल्क आकारते ज्याचा तुम्ही वापरही केला नाही. हे काम मालवेअरद्वारे करता येते.
advertisement
बॅटरी लवकर डिस्चार्ज
मालवेअरचे एक संकेत म्हणजे बॅटरीचे फास्ट डिस्चार्ज होते. अनेक मालवेअर बॅकग्राउंडमध्ये वेगवेगळी टास्क करत राहतात. यामुळे बॅटरी लवकर संपते. त्याचप्रमाणे, सामान्य स्थितीतही फोन खूप गरम होत असेल तर ते मालवेअरमुळे देखील असू शकते.
नव्या वर्षात फोन घेण्याचा विचार करताय? Vivo आणि Oppo लाही मागे सारतील असे 5 फोन, किंमत फक्त...
फोनची स्पीड कमी होणे
फोनमध्ये मालवेअर असेल तर फोनचा कामाचा वेग कमी होतो. खरंतर, मालवेअर फोनच्या कंपोनेंटकडून खूप काम घेते. अशा स्थितीत फोनची इतर कामे मंद होतात आणि काही वेळा टास्क क्रॅशही होतात.
फोनवर नको असलेले ॲप येत आहे
अनेक वेळा एखादे ॲप डाउनलोड करताना त्याच्यासोबत मालवेअरही डाऊनलोड केले जाते, ज्यामुळे फोनवर अतिरिक्त ॲप्स इन्स्टॉल होतात. त्यामुळे ॲप लिस्टवर लक्ष ठेवा आणि कोणतेही नको असलेले ॲप इन्स्टॉल केले असल्यास ते उघडू नका.
