advertisement

BSNL ची बंपर ऑफर! महिनाभरासाठी देतेय Free इंटरनेट, लगेच घ्या फायदा

Last Updated:

BSNL Free Internet: बीएसएनएल ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर घेऊन येत आहे. आता तर बीएसएनएल ग्राहकांना फ्रीमध्ये इंटरनेट देणार आहे. याचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता चला जाणून घेऊया.

बीएसएनएल
बीएसएनएल
BSNL Free Internet Offer: BSNL ने आपल्या ग्राहकांना एक उत्तम भेट दिली आहे. तुम्ही BSNL चा फायबर ब्रॉडबँड वापरत असाल आणि तुमचे मासिक भाडे 500 रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एक महिन्याचे इंटरनेट पूर्णपणे फ्री मिळेल. सणांच्या निमित्ताने ही ऑफर दिली जात आहे. तुम्ही या ऑफरमध्ये इंट्रेस्टेड असाल तर लगेच या योजनेचा लाभ घ्या, कारण ही ऑफर केवळ 31 डिसेंबरपर्यंत व्हॅलिड आहे.
BSNL New Year Offer
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी एक नवीन ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही फायबर बेसिक निओ किंवा फायबर बेसिक प्लॅनवर एक महिन्याचे इंटरनेट फ्री वापरू शकता. पण या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हा प्लॅन किमान 3 महिन्यांसाठी घ्यावा लागेल. ही ऑफर केवळ 31 डिसेंबरपर्यंत व्हॅलिड आहे.
advertisement
BSNL Fiber Basic Neo Benefits
BSNL फक्त 449 रुपयांमध्ये एक उत्तम ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनचे नाव आहे फायबर बेसिक निओ. यामध्ये तुम्हाला वेगवान इंटरनेट मिळेल, म्हणजेच 30 मेगाबाइट प्रति सेकंदाचा वेग. या स्पीडसह, तुम्ही एका महिन्यात 3300 GB डेटा वापरू शकता, म्हणजेच दररोज 100 GB पेक्षा जास्त. सगळा डेटा संपल्यानंतरही तुम्ही स्लो स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याच्या मदतीने तुम्हाला घरातील कुठूनही अनलिमिटेड कॉल्स करण्याची सुविधा मिळेल. तुम्ही हा प्लॅन तीन महिन्यांसाठी घेतल्यास तुम्हाला 50 रुपयांची सूटही मिळेल.
advertisement
BSNL Fiber Basic 499 Benefits
बीएसएनएलचा फायबर बेसिक नावाचा प्लॅन आहे. त्याची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अतिशय वेगवान इंटरनेट मिळेल, म्हणजेच 50 मेगाबाइट्स प्रति सेकंदाचा वेग मिळेल. तुम्ही एका महिन्यात 3300 GB डेटा वापरू शकता. सगळा डेटा संपल्यानंतरही तुम्ही स्लो स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याच्या मदतीने तुम्हाला घरातील कुठूनही अनलिमिटेड कॉल्स करण्याची सुविधा मिळेल. तुम्ही हा प्लॅन तीन महिन्यांसाठी घेतल्यास तुम्हाला 100 रुपयांची सूटही मिळेल. पण ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंतच आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
BSNL ची बंपर ऑफर! महिनाभरासाठी देतेय Free इंटरनेट, लगेच घ्या फायदा
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement