advertisement

Instagram वर येतंय भारी फीचर! जे आतापर्यंत झालं नाही ते होणार, पाहा काय

Last Updated:

Instagram New Feature: इंस्टाग्रामवर अनेक मजेदार फीचर्स आहेत जी जगभरातील लाखो यूझर्स वापरतात. तुम्ही देखील Instagram वापरत असल्यास, तुम्हाला लवकरच एक नवीन फीचर मिळू शकते. या फीचरद्वारे तुम्ही ते काम करू शकाल जे तुम्ही आतापर्यंत करू शकले नाहीत. इन्स्टाग्रामच्या नवीन फीचरबद्दल जाणून घेऊया.

इंस्टाग्राम रिल्स
इंस्टाग्राम रिल्स
Instagram Story New Feature: इंस्टाग्राम जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. तुम्हीही ते वापरत असाल तर नवीन फीचरसाठी तयार व्हा, लवकरच एक फीचर येऊ शकते जे इंस्टाग्रामवरील तुमचा अनुभव सुधारेल. हे फीचर विशेषतः Instagram स्टोरीशी संबंधित आहे. असं कधी झालंय का की, तुमच्या फ्रेंडची स्टोरी पाहायची राहिली आहे. आता इन्स्टाग्रामचे नवीन फीचर तुम्हाला एक्सपायर्ड झालेल्या स्टोरीज पाहण्याची संधी देईल, जेणेकरून तुम्ही स्टोरी मिस करु शकणार नाही.
इंस्टाग्राम स्टोरी फक्त 24 तास लाइव्ह राहते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंस्टाग्रामचे नवीन फीचर जुन्या स्टोरीज दाखवण्यातही मदत करेल. सर्व काही व्यवस्थित राहिल्यास, तुम्हाला एका सेक्शनमध्ये एक्सपायर्ड झालेल्या स्टोरी पाहण्याची संधी मिळेल. जे काम अद्याप केले गेले नाही ते आगामी फीचर कसे करेल पाहूया.
advertisement
Instagram चे नवीन फीचर
इंस्टाग्राम नवीन Story Highlights फीचरची टेस्टिंग करत आहे. हे फीचर स्टोरी ट्रेमध्ये फॉलोअर्सच्या एक्सपायर्ड झालेल्या स्टोरी दाखवेल. हा फीडच्या टॉपचा एरिया आहे, जिथे तुम्ही फ्रेंडच्या स्टोरी पाहतात. सध्या, या फीचरची टेस्टिंग सुरू आहे आणि सध्या फारच कमी लोक ते वापरू शकतात.
एक्सपायर्ड स्टोरी दिसतील
लोकांचा अनुभव सुधारण्यासाठी Instagram सतत नवनवीन फीचर्स आणत आहे. स्टोरी हायलाइट्स फीचर देखील याचाच एक भाग आहे.ज्या लोकांची स्टोरी पाहणं राहून जाते त्यांच्यासाठी हे फीचर खूप कामाचे आहे. मात्र हे फिचर फक्त एक आठवडा एक्सपायर्ड स्टोरीज दाखवते.
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा
स्टोरी हायलाइट्स फीचरची खास गोष्ट अशी आहे की, ते केवळ म्युच्युअल फॉलोअर्सच्या स्टोरीववर काम करेल. याशिवाय, हायलाइट्स फीचरद्वारे एक्सपायरी झाल्यानंतरही इन्स्टाग्रामवर ज्या स्टोरीज दाखवायच्या आहेत त्या तुम्हाला सेव्ह कराव्या लागतील. सध्या, Instagram ने आगामी फीचरची ऑफिशियली पुष्टी केलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Instagram वर येतंय भारी फीचर! जे आतापर्यंत झालं नाही ते होणार, पाहा काय
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement