TRENDING:

ई-कॉमर्ससह फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सच्या हिडन चार्जेसचा वैताग आलाय? येथे करा तक्रार 

Last Updated:

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सवरील हिडेन चार्जेजमुळे अनेकदा बिलांमध्ये वाढ होते. जर तुमच्यासोबत असे घडले असेल, तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दिवाळीसाठी, फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मवर सेल आयोजित करण्यात आले होते. या सेलमध्ये सर्वात महागड्या प्रोडक्ट्सवरही मोठी सूट देण्यात आली. त्याचप्रमाणे, झेप्टो आणि स्विगीने देखील सणासाठी लक्षणीय डिस्काउंट दिल्या. तसंच, काही प्लॅटफॉर्मने डिस्काउंटनंतर प्रोडक्टच्या किमती कमी दाखवल्या. परंतु ऑर्डर करताना हिडन चार्जेज लादून ग्राहकांकडून वास्तविक किमतीपेक्षा जास्त शुल्क आकारले. भारत सरकारने या ड्रिप प्राइसिंग घोटाळ्याबाबत इशारा देखील जारी केला आहे. जर तुम्ही अशा घोटाळ्याला बळी पडला असाल, तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

ड्रिप प्राइसिंग घोटाळा म्हणजे काय?

अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म ग्राहकांना फसवण्यासाठी या डार्क पॅटर्नचा वापर करतात. सुरुवातीला प्रोडक्टवर डिस्काउंट दाखवले जाते, परंतु ऑर्डर करताना ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागतात. उदाहरणार्थ, समजा एखादा प्लॅटफॉर्म डिस्काउंटनंतर ₹1,000 चे स्मार्टवॉच दाखवत आहे. मात्र, जेव्हा एखादा ग्राहक ते त्यांच्या कार्टमध्ये जोडतो आणि ऑर्डर करतो तेव्हा अनेक हिडन चार्जेजमुळे किंमत वाढते. ग्राहकांना सुरुवातीला या शुल्कांची माहिती दिली जात नाही. याला ड्रिप प्राइसिंग स्कॅम म्हणून ओळखले जाते.

advertisement

Fast Charging मुळे बॅटरी खरंच खराब होते? 90% लोकांना माहिती नाही सत्य

तक्रार कशी करावी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
450 झाडांची केली लागवड, सीताफळ शेतीतून लाखात कमाई, कसा केला यशस्वी प्रयोग?
सर्व पहा

तुम्ही अशा घोटाळ्याचे बळी पडला असाल किंवा डिस्काउंट असूनही प्रोडक्टसाठी जास्त पैसे द्यावे लागले असतील, तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता. अशा प्रकरणांमध्ये राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन मदत करू शकते. फक्त 1915 वर कॉल करा आणि प्रोडक्ट आणि प्लॅटफॉर्मबद्दल तक्रार नोंदवा. त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन प्रकरणाची चौकशी करेल आणि तुम्हाला मदत करेल. अशा प्रकारे, तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी ऑनलाइन शॉपिंग आणि ऑर्डरिंग अनुभव सुधारू शकता.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
ई-कॉमर्ससह फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सच्या हिडन चार्जेसचा वैताग आलाय? येथे करा तक्रार 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल