देशातील मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला. कंपनीने आपल्या दोन स्वस्त आणि लोकप्रिय रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली. त्यामुळे हे प्लॅन आता पूर्वीपेक्षा महाग झाले आहेत. विशेषतः ज्या ग्राहकांना कमी दिवसांसाठी किंवा कमी खर्चात सेवा हवी असते, त्यांच्यासाठी हा निर्णय डोकेदुखीचा ठरणार आहे.
फेस्टिव्ह सीझन तोंडावर असताना कंपनीने हे पाऊल उचलल्यामुळे अनेक युजर्स प्रभावित होण्याची शक्यता आहे. प्लॅनमध्ये मिळणारे मुख्य फायदे डेटा, कॉलिंग यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र व्हॅलिडिटी कमी झाल्याने ग्राहकांना आता वारंवार रिचार्ज करावा लागणार आहे.
advertisement
189 रुपयांच्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. Vi ने आपल्या 189 रुपयांच्या अनलिमिटेड रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी थेट कमी केली आहे. पूर्वी 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती ती आता 26 दिवसांवर आणली आहे. नव्या प्लॅनमध्ये आता 2 GB ऐवजी 1 GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये बेनिफिट कमी आणि नुकसान जास्त होणार आहे.
189 रुपयांच्या या प्लॅनमध्ये आता 26 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 फ्री SMS मिळतील. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर आणि पेटीएम (Paytm) सारख्या प्लॅटफॉर्मवर ही कमी झालेली व्हॅलिडिटी दिसत आहे. याशिवाय डेटाही कमी मिळणार आहे.
98 रुपयांच्या प्लॅनमध्येही कपात करण्यात आली आहे. Telecomtalk च्या अहवालानुसार, Vi ने केवळ 189 रुपयांच्याच नव्हे, तर 98 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटीही कमी केली आहे. पूर्वी 98 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 14 दिवस होती. ती आता थेट 10 दिवसांपर्यंत करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये आता ग्राहकांना 100 रुपये खर्च करून फक्त 10 दिवसांसाठी 200 MB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल.
याचाच अर्थ, ज्या ग्राहकांना महिन्याभराची सेवा हवी आहे, त्यांना आता 98 रुपयांचे तीन रिचार्ज करावे लागतील, म्हणजे महिन्याला जवळपास 296 रुपये खर्च येणार. हा प्लॅन युजर्ससाठी खूपच महागडा ठरत आहे.प्लॅन्समध्ये झालेले बदल आणि नवीन दरांमुळे रिचार्ज करण्यापूर्वी Vi च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा ॲपवर व्हॅलिडिटी आणि फायदे एकदा तपासून पाहा.इतर पर्यायांचा विचार करा
जर तुम्हाला जास्त व्हॅलिडिटी आणि चांगले फायदे हवे असतील, तर Vi कडे दोन चांगले पर्याय उपलब्ध आहेत
218 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 1 महिन्याच्या व्हॅलिडिटी सह येतो आणि यात 4 GB डेटा तसेच फ्री SMS मिळतात.
95 रुपयांचा डेटा प्लॅन: हा खास डेटा प्लॅन असून यात 14 दिवसांसाठी ४GB डेटा मिळतो. विशेष म्हणजे, यासोबत SonyLIV मोबाईलचे फ्री सबस्क्रिप्शनही दिले जाते. डेटाची गरज असणाऱ्यांसाठी हा प्लॅन जास्त फायदेशीर ठरू शकतो.