पण कधीकधी नकळत लोक दरवाजा किंवा खिडकी उघडी ठेवून एसी सुरु करतात. अशावेळी काय आणि कोणत्या मुद्यांना सामोरं जावं लागू शकतं? असा प्रश्न लोकांच्या मनात उभा रहातो. चला याबद्दल माहिती घेऊ.
एअर कंडिशनरची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि वीज बिल वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगत आहोत. तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे की जर खोलीत खिडक्या आणि दरवाजे उघडे असतील तर ते लगेच बंद करा. कारण थंड हवा लवकर बाहेर जाईल आणि गरम हवा आत येईल. यामुळे तुमची खोली लवकर थंड होणार नाही. त्यामुळे विजेचा वापर वाढेल आणि वीज बिलही वाढेल.
advertisement
हे देखील लक्षात ठेवा
एसी चालवताना खोली सीलबंद राहील याची काळजी घ्यावी. असे केले नाही तर एसी नीट चालणार नाही आणि वीज बिलही खूप जास्त येईल. एसी चालवताना, लक्षात ठेवा की त्याचे कॉम्प्रेशन जास्त वाढू नये आणि ते सामान्यपणे कार्य करत रहावे.
खोली थंड झाल्यावर पंखा चालू करा
जर तुमची खोली थंड झाली असेल तर तुम्ही पंखा चालू करू शकता. यामुळे तुमची खोली जास्त काळ थंड राहते आणि तुमच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. एसी जास्त वेळ चालवल्याने मशीनवर खूप भार पडतो आणि एसी ब्लास्टिंगची शक्यता लक्षणीय वाढते.
