TRENDING:

WhatsApp वर 'डिजिटल स्ट्राइक', 'या' देशात ब्लॉक करण्याचा प्रयत्न, सरकारी अ‍ॅप येणार?

Last Updated:

WhatsApp Block in Russia: अमेरिकेसोबतच्या तणाव आणि युक्रेनशी युद्धा दरम्यान रशियाने व्हॉट्सअॅपला पूर्णपणे ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारचा हेतू 10 कोटी लोकांना आपल्या सुरक्षित आणि सरकारी मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करणे आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
WhatsApp Block: अमेरिकेसोबतचा वाढता तणाव आणि युक्रेनसोबतच्या युद्धा दरम्यान रशियाने मोठ्या 'डिजिटल सर्जिकल स्ट्राइक' ची तयारी केली आहे. रशियाने व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी आणण्याची तयारी केली आहे. असं पहिल्यांदाच झालेलं नाही, रशियाने व्हॉट्सअ‍ॅप सर्व्हिसवर प्रतिबंधाविषयी वाद वाढला आहे. गेल्या वर्षीही, अशाच प्रकारच्या बातम्या अनेक वेळा समोर आल्या होत्या की मेटाने रशियन अधिकाऱ्यांवर 10 कोटींहून अधिक लोकांकडून खाजगी संभाषणाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
व्हॉट्सअॅप अपडेट्स
व्हॉट्सअॅप अपडेट्स
advertisement

WhatsApp यावर काय म्हणते?

WhatsApp ने मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत या गोष्टीची माहिती दिली की, रशियाच्या सरकारने लोकांना सरकारी सर्व्हिलान्स अ‍ॅपकडे वळवण्यासाठी WhatsApp पूर्णपणे ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, हे ब्लॉकिंग म्हणजे रशियाने यूझर्सना सरकारी पाळत ठेवणाऱ्या अ‍ॅपकडे वळवण्याचा प्रयत्न होता.

Valentine’s Day ला OnePlusचं मोठं गिफ्ट! टॅबलेट्स, ईयरबड्स झाले स्वस्त 

advertisement

100 मिलियनहून अधिक यूझर्सना खाजगी आणि सुरक्षित कम्युनिकेशनपासून दूर करण्याचा प्रयत्न करणे हे एक मागे पडलेले पाऊल आहे आणि यामुळे रशियामधील लोकांच्या सुरक्षिततेलाच धोका निर्माण होईल. आम्ही यूझर्सना जोडलेले ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. कंपनीच्या प्रवक्त्याने रॉयटर्सला सांगितले की, "रशियन सरकार देशांतर्गत विकसित प्लॅटफॉर्मना प्रोत्साहन देत आहे आणि इंटरनेट स्पेसवर अधिक नियंत्रण हवे आहे."

advertisement

AC खरेदीची सुवर्ण संधी! येथे 1.5 टन Window ACs वर मिळतंय 50% डिस्काउंट 

रशियात हे अ‍ॅप केलं जातंय प्रमोट 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तरुण शेतकऱ्याने केला कलिंगडाचा यशस्वी प्रयोग, 65 दिवसांत 5 लाख कमाई
सर्व पहा

फेब्रुवारी 2022 मध्ये मॉस्कोने यूक्रेनवर हल्ल्यानंतर परदेशी टेक प्रोव्हायडर्ससोबत सुरु असलेला वाद आणखी वाढला आहे. रशियाने MAX नावाच्या सरकारी सपोर्टेड कॉम्पिटिटर अ‍ॅपला प्रमोट केलं जातंय. या अ‍ॅपविषयी टिकाकारांनी दावा केला की, या अ‍ॅपचा वापर यूझर्सना ट्रॅक करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसंच दुसरीकडे सरकारी मीडियाने हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटलेय.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp वर 'डिजिटल स्ट्राइक', 'या' देशात ब्लॉक करण्याचा प्रयत्न, सरकारी अ‍ॅप येणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल