TRENDING:

चॅटिंग थांबलं, कामं अडकली! व्हॉट्सॲप डाउन; युजर्सना लॉगइनमध्ये मोठी अडचण!

Last Updated:

WhatsApp Web जगभरात डाउन झाल्याने युजर्सना लॉगिन व मेसेजिंगमध्ये अडचणी येत आहेत. #WhatsAppDown ट्विटरवर ट्रेंड होत असून Downdetector वर तक्रारी वाढल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मेसेज जात नाहीत, लॉगिन होत नाही, सारखं क्यू आर कोड लॉगइन करुन अडचण येते किंवा लॉगइन झालं मात्र लोड व्हायला वेळ लागतोय असे एक नाही तर अनेक अडचणी सध्या जगभरातील युजर्सना येत आहेत. याचं कारण म्हणजे अचानक WhatsApp ची सेवा डाउन झाली आहे. सध्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरळीत चालू असलं तरी वेबवर मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
News18
News18
advertisement

आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजेच शुक्रवारी सकाळीच जगभरातील लाखो व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मोठा फटका बसला आहे. WhatsApp Web अचानक ठप्प झाल्यामुळे युजर्सना आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येत नाहीये. विशेषतः ऑफिसच्या कामासाठी डेस्कटॉप व्हर्जनवर अवलंबून असलेल्या नोकरदारांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे.

सकाळी ९ वाजेच्या सुमारास व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी वाढल्या. युजर्स क्यूआर कोड स्कॅन करून डिव्हाइस लिंक करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण लॉगिन होत नाहीये.ज्यांचे व्हॉट्सअ‍ॅप आधीच लॉगिन आहे, त्यांच्या जुन्या चॅट्स लोड होत नाहीयेत. तसेच मेसेज येण्या-जाण्यासाठी प्रचंड उशीर होत आहे.

advertisement

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बिघाड होताच युजर्सनी आपला मोर्चा ट्विटरकडे वळवला आहे. तिथे #WhatsAppDown हा हॅशटैग ट्रेंड होत आहे. अनेक युजर्सनी कनेक्टिंग मोडवर अडकलेल्या व्हॉट्सअ‍ॅपचे स्क्रीनशॉट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. "गेल्या एक तासापासून मी लॉगिनचा प्रयत्न करतोय, पण काहीच प्रतिसाद मिळत नाहीये," अशी पोस्ट एका त्रस्त युजरने केली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थेट टेरेसवर भरते कवितांची मैफिल, मनाला भिडणारं संभाजीनगरमधील गेट-टुगेदर, Video
सर्व पहा

आउटेज ट्रॅक करणाऱ्या 'Downdetector' या वेबसाइटनुसार, सकाळी ८:५४ पासूनच तक्रारींची नोंद सुरू झाली होती. ९ वाजल्यानंतर या तक्रारींचा आकडा झपाट्याने वाढला. भारतसह जगातील अनेक देशांमधील सर्व्हरमध्ये ही समस्या दिसून येत आहे. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपकडून अद्याप या तांत्रिक बिघाडावर अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
चॅटिंग थांबलं, कामं अडकली! व्हॉट्सॲप डाउन; युजर्सना लॉगइनमध्ये मोठी अडचण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल