पाणी काढताना पाय घसरला अन् घात झाला
मिळालेल्या माहितीनुसार,शशीकुमार 17 जानेवारी रोजी घरासाठी पाणी आणण्यासाठी विहिरीजवळ गेला होता. त्याने आधी एक बादली पाणी काढून घरी नेले. त्यानंतर पुन्हा पाणी काढण्यासाठी तो विहिरीकडे गेला. मात्र, बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांना तो कुठेतरी गेला असावा असा अंदाज वाटला.
advertisement
रात्री उशिरापर्यंत शशीकुमार घरी न परतल्याने नातेवाइकांनी त्याचा शोध सुरू केला. शोधादरम्यान विहिरीजवळ त्याच्या चपला आढळून आल्या. यामुळे संशय बळावला. घटनेची माहिती कासारवडवली पोलिस ठाण्यात देण्यात आली.
त्यानंतर पोलिस हवालदार दीपक ठाकरे घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने विहिरीत शोध मोहीम राबवण्यात आली. सुमारे 25 ते 30 फूट खोल विहिरीत शशीकुमारचा मृतदेह आढळून आला. 18 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला.
या घटनेची कासारवडवली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नाकोडी कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
