दरम्यान, तळोजा पोलीस ठाण्यात कुलमित सिंग विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून आतापर्यंत त्याच्यासह इतर 15 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. शिवाय, 1 कोटी 19 लाख 13 हजार 500 रुपयांचा अंमली पदार्थांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सतत देखरेख करून आणि मिळालेल्या गुप्त माहितीनंतर कुलमीत सिंगला 21 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. नवी मुंबईमध्ये पोलिसांनी अंमली पदार्थाच्या इतका मोठ्या रॅकेटचा खुलासा केल्यामुळे परिसरातील तरूणाईंमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती केली जात आहे.
advertisement
नोव्हेंबर 2025 मध्ये एएनसीने काही गोपनीय माहितीच्या आधारे तळोजा फेज- 2 परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी मास्टरमाइंडचा मुलगा नवज्योत सिंग उर्फ विक्की रंधावा आणि गुरज्योत सिंग उर्फ सनी रंधावा या दोघांनाही अटक केली होती. अटकेमध्ये त्यांच्याकडून 158 ग्रॅम हेरॉइन आणि 40 ग्रॅम अफू जप्त केले होत. ज्याची एकूण किंमत 1.19 कोटी रुपये इतकी आहे. तपासात असे स्पष्ट झाले की, ही टोळी पंजाबमधून ट्रक ड्रायव्हरच्या माध्यमातून अंमली पदार्थ (हेरॉईन आणि अफू (अफिम) ) आणत होते. नवी मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विक्रेत्यांच्या मदतीने ते वितरित करत होते.
कुलमित सिंग कायमच तरूणाईला नजरेसमोर ठेवून अंमली पदार्थांची विक्री करत होता. त्याचा ग्राहकवर्गच मोठ्या प्रमाणावर तरूणाई होती. "हे एक संघटित आंतरराज्यीय ड्रग्ज नेटवर्क होते. कुलमीत सिंग पंजाबमधून नवी मुंबईमध्ये ड्रग्ज पुरवण्याचे काम सुरू होते. त्याने नवी मुंबईत स्वत:चं चांगलंच भक्कम वितरण नेटवर्क स्थापित केले होते. त्याच्या अटकेमुळे, आम्ही ड्रग्ज तस्करीचा एक मोठा दुवा उद्ध्वस्त केला आहे. आम्ही आता आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहोत आणि उर्वरित साथीदारांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे काम करत आहोत," अशी प्रतिक्रिया एएनसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांनी दिली आहे. दरम्यान, एनडीपीएस कायद्याच्या कलम 21(B), 21(C) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले सर्व आरोपी सध्या तळोजा तुरुंगात आहेत.
