TRENDING:

Palghar: भयंकर! मुलगी परीक्षेसाठी बाहेर, घरी कॉल लावला असता आई-वडिलांनी...; घटनेने गाव हळहळलं

Last Updated:

Palghar Crime News : पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळ असलेल्या उसरणी गावात दाम्पत्यासोबत एक दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळबळ व्यक्त केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पालघर : घरातील मुलगी परीक्षेसाठी बाहेर पडताच तिच्या आई-वडिलांनी टोकाचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
News18
News18
advertisement

काय घडलं त्या घरात?

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील उसरणी गावात कैलास किणी (वय ४७) आणि कोमल किणी (वय३८) हे त्यांच्या मुलगी किमया (वय१९) असे एक कुटुंब आनंदाने राहतात. याच गावात यांचे एक किराणा सामानाचे दुकान असून यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. त्यात त्यांना मधुमेहाचा त्रासही असल्याचे समोर आले होते. मात्र मंगळवारी या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला .

advertisement

किणी दाम्पत्यांची मुलगी किमया ही मंगळवारी ठाणे येथे परीक्षेसाठी गेली होती. घरी काही कामानिमित्ताने फोन करत होती पण फोन कोणीही उचलत नसल्याने तिने त्याच गावात राहत असलेल्या काकूला सांगितले मात्र तिला घर बंद असल्याचे दिसून आले. याबाबत तिने पती संदीप यांना सांगितले. काही वेळात संदीप यांनी माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी जाऊन घरचा दरवाजा तोडला असता दोघोही बेडरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

advertisement

समोर आले धक्कादायक कारण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

मिळालेल्या माहितीनुसार. किणी यांचे एक सफाळेत ताडी पट्ट्याचे दुकान होते त्यासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जाच डोंगर वाढत होता तसेच देणेकरी, बँक कर्ज रकमेच्या मागणीचा तगादा लावत असल्याने दोघही गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. हा कर्जाचा बोजा सहन न झाल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपले.

मराठी बातम्या/ठाणे/
Palghar: भयंकर! मुलगी परीक्षेसाठी बाहेर, घरी कॉल लावला असता आई-वडिलांनी...; घटनेने गाव हळहळलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल