TRENDING:

Thane : विजयाचे सेलिब्रेशन पडलं महागात, ठाण्यात फटाके फोडताना कारवर पडल्या ठिणग्या; VIDEO पाहा

Last Updated:

Thane Viral Video : ठाण्यातील इंदिरा नगर परिसरात भारताच्या विश्वचषक विजयानंतर जल्लोष करताना एक धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : न्यूझीलंडचा पराभव करत भारताने काल तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला. अनेक शहरांमध्ये आणि गल्ल्यांमध्ये नागरिकांनी फटाके फोडून आणि जल्लोष करत आनंद व्यक्त केला. मात्र काही ठिकाणी या उत्साहाला धोकादायक वळणही लागल्याचे दिसून आले.
dangerous firecracker celebration in indira nagar thane video
dangerous firecracker celebration in indira nagar thane video
advertisement

नेमके घडले काय?

ठाणे शहरातील इंदिरा नगर परिसरातही भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना एक धक्कादायक प्रकार घडला. काही तरुणांनी रस्त्यावर फटाके लावून जल्लोष सुरू केला होता. त्याच वेळी त्या रस्त्यावरून एक कार जात होती. फटाके पेटलेले असतानाच ती कार त्याच्या वरुन गेल्याचे दिसून आले.

फटाके फुटत असताना कार पुढे जात होती मात्र सर्व प्रकार घडल्याने कार तिथंच थांबवण्यात आली. मात्र काही क्षण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. फटाक्यांच्या ठिणग्या कारवर पडताना दिसल्या. त्यामुळे आसपास उभ्या असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

मात्र कार चालकाने घाबरून न जाता शांतपणे गाडी पुढे नेली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही आणि कारचेही मोठे नुकसान झाले नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
Thane : विजयाचे सेलिब्रेशन पडलं महागात, ठाण्यात फटाके फोडताना कारवर पडल्या ठिणग्या; VIDEO पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल