फेऱ्या आणि डब्बे वाढणार का?
या कामामुळे डहाणूपर्यंत 15 डब्यांची लोकल सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. वैतरणा ते डहाणू दरम्यान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून सध्या धावणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे 15 डब्यांची सेवा अत्यावश्यक असल्याचे प्रवासी संघटनांचे मत आहे.
दरम्यान पश्चिम रेल्वेने 19 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासूनच 12 एसी लोकल आणि तीन नवीन सर्वसाधारण लोकल सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र या वाढीव फेऱ्यांमध्ये डहाणू मार्गावरील 15 डब्यांच्या लोकलबाबत स्पष्ट निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. एप्रिलमध्ये नव्या वेळापत्रकात काही फेऱ्या वाढवण्यात आल्या असल्या तरी डहाणूकरांची अपेक्षा अद्याप अपूर्ण आहे.
advertisement
पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जाते. तरीही प्रत्यक्ष घोषणा कधी होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. प्लॅटफॉर्मची कामे पूर्ण झाल्याने फेब्रुवारीअखेर 15 डब्यांची लोकल सुरू करावी आणि एप्रिलच्या वेळापत्रकात अधिक फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी प्रवासी संस्थांकडून करण्यात येत आहे.
