हौस महागात पडली
रविवारी सायंकाळच्या सुमारास बोईसरमधील ओसवाल एम्पायर परिसरातील एका सराफा दुकानात एक व्यक्ती ग्राहक असल्याचे भासवत दाखल झाला. सोनसाखळी खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याने दुकानदाराशी संवाद साधला. दुकानदार दागिने दाखवत असतानाच संधी साधत आरोपीने एक सोनसाखळी उचलली आणि लगेत दुकानाबाहेर पळ काढला.
दागिने चोरीस गेल्याचे लक्षात येताच दुकानदाराने जोरजोरात आरडाओरड केली. आवाज ऐकताच आसपासच्या नागरिकांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. काही अंतरावर असलेल्या सर्कस मैदानाजवळ नागरिकांनी चोराला पकडले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला चोप देत बोईसर पोलिसांच्या ताब्यात दिले.
advertisement
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने धक्कादायक माहिती दिली. काही दिवसांपूर्वी त्याने कर्ज घेऊन दुचाकी खरेदी केली होती. मात्र कायमस्वरूपी नोकरी नसल्याने तीन ते चार महिन्यांचे कर्जहप्ते थकले होते. आर्थिक ताण वाढल्याने आणि कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज भासल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडल्याची कबुली दिली.
