वंदना खरात या घरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे पती पेंटिंगचे काम करतात. 6 जानेवारी रोजी नातेवाइकाच्या निधनामुळे त्यांचे पती अहिल्यानगर येथे गेले होते. त्यामुळे त्या काही दिवस घरात एकट्याच होत्या. 8 जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता वंदना नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्यांची दोन्ही मुले सकाळी साडेनऊच्या सुमारास शाळा आणि इतर कामांसाठी घराबाहेर गेली.
advertisement
घर बंद असल्याचे पाहून अज्ञातांनी संधी साधली
घर दिवसभर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दुपारच्या सुमारास विठ्ठल निवास या इमारतीमधील त्यांच्या घराचे कुलूप हत्याराच्या साहाय्याने तोडले. घरात प्रवेश करून चोरट्यांनी 20 हजार रुपयांची सोनसाखळी आणि 61 हजार 500 रुपयांचे सोन्याचे पेंडल चोरून नेले.
दुपारी अडीच वाजता वंदना घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घर पूर्ण पाहिले असता कपाटातील दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
