पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्य्रातील दिवा साबे गावातून या आरोपीला अटक करण्यात आली आहे. शिवदयाळ विश्वकर्मा (४५) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. शिवदयाळ विश्वकर्माने पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. त्यावेळी त्याच्या बहिणीने लाखो रुपये खर्चून त्याला जामिनावर सोडवलं होतं. पण जेव्हा बहिणीने शिवदयाळकडे पैशाची मागणी केली तर त्याच भावाने पैसे मागणाऱ्या बहिणीवर गोळीबार केला. त्यानंतर मुंब्रा परिसरात दडून बसला होता. शनिवारी वाळीव पोलिसांनी त्याला अटक केली. याचदरम्यान ज्या घरात लपून बसला होता. त्याच्या घरात जिवंत हॅण्ड ग्रेनेड आणि गावठी रिव्हॉल्व्हरही पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
advertisement
बहिणीवर केला गोळीबार
अधिक माहिती अशी की, मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवा साबे गाव इथं वालीव पोलीस ठाणे, विरार मिरा भाईंदर आयुक्तालय येथील ASI पाटील तसंच पोलीस हवालदार किरण म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री 03 वाजता पुष्पा अशोक विश्वकर्मा (वय 42 वर्षे) यांच्यावर बोगदा पाडा वसई इथं गोळीबार झाला होता. पोलिसांनी गुन्ह्याबाबत शोध घेत असता, तक्रारदार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चौकशी दरम्यान त्यांचा भाऊ नामे शिवशंकर राम मुरत विश्वकर्मा उर्फ बबलू यानेच आपल्या बहिणीवर गोळीबार केल्याचं उघड झालं होतं.
स्कुटरच्या डिक्कीत गावठी रिव्हाल्व्हर सापडली
पोलिसांनी शोध सुरू केला असता साबेगाव दिवा इथं शिवशंकर राम मुरत विश्वकर्मा उर्फ बबलू हा चाळ नंबर 29, रूम नंबर 9 साबे गाव दिवापूर्व इथं लपून बसला होता. ASI पाटील आणि हवालदार म्हात्रे यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या ताब्यात असलेली एक्टिवा क्रमांक 04 GA 557 ही मिळून आली. ASI पाटील,हवालदार म्हात्रे यांनी गाडीची तपासणी केली असता गाडीचे डिक्कीमध्ये एक गावठी रिव्हाल्व्हर आणि जिवंत राऊंड मिळून आले.
जुने हॅण्ड ग्रॅनाईट आढळले
तसंच एक स्टीलच्या डब्यामध्ये गजलेले जुने हॅण्ड ग्रेनेड मिळून आलं. तात्काळ त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. बीडीडीएस पथक ठाणे यांना तात्काळ घटनास्थळी बोलवलं. सदर बाबत HE हॅण्ड ग्रेनेड सुरक्षित ठिकाणी हलवत असल्याचं सांगितलंय. तरी ASI पाटील, हवालदार म्हात्रे वालीव पोलीस ठाणे येथे पुढील नोंद गुन्याच्या चौकशीसाठी आरोपी यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली आहे.
