त्या दिवशी नेमकं घडलं काय?
शनिवार,3 जानेवारी रोजी वेवजी सोरठपाडा येथील भारती अकादमीमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत मॅरेथॉन शर्यत घेण्यात आली. या शर्यतीत दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यीनीने जिद्दीने सहभाग घेत तिसरा क्रमांक पटकावला. शर्यत पूर्ण केल्यानंतर काही वेळातच तिला धाप लागली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ती मैदानावर खाली बसली आणि काही क्षणांतच बेशुद्ध पडली.
advertisement
धावून मिळवला तिसरा क्रमांक, पण जीव वाचवता आला नाही
विद्यार्थींची आरोग्याची स्थिती पाहताच शाळा प्रशासनाने तिला तातडीने जवळच्या गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार विद्यार्थ्यीनीचा हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शाळेतील या घडलेल्या घटनेमुळे उंबरगाव आणि तलासरी तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
