डहाणू शहराला 2 दिवस पाण्याविना राहावे लागणार
नियोजित पाणी कपातीचा परिणाम डहाणू शहरातील सर्व भागांवर होणार असून नागरिकांना दोन दिवस पाण्याविना राहावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वीच आपल्या दैनंदिन गरजेनुसार पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.
तसेच साठवलेले पाणी अत्यंत काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापरण्याचेही प्रशासनाने नागरिकांना सुचवले आहे. पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
या दुरुस्ती आणि साफसफाईच्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल डहाणू नगर परिषद प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, भविष्यात सुरळीत आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुरू राहावा यासाठी हे काम अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
'या' तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार
गुरुवार 9 जानेवारी आणि शुक्रवार 10 जानेवारी 2026 या दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी अक्षय गुडघे यांनी या जाहीर आवाहनास मान्यता दिली असून नियोजित काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले असून काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल अशी माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
