TRENDING:

Mumbra Crime : मुंब्रा हादरले! अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट; नवरा-बायकोचे चक्रावणारे कांड आले समोर

Last Updated:

Mumbra News : मुंब्र्यातील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे पत्नीच्या अनैतिक संबंधातून शेवटला जाऊन पोलिसांनी तिला आणि तिच्या पतीला अटक केलेली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : सुखी संसाराचे स्वप्न करणाऱ्यांच्या वाटेला अनेकदा जोडादाराचा फसवेपणा असतो. या सर्व घटनेचे वळण अनेकदा अशा टप्प्यावर जाते कि सर्व संपते. सध्या मुंब्रातून असाच एक प्रकार समोर आलेला आहे आणि ज्यात एकाला जीव गमवावा लागलेला आह
Mumbra Crime News
Mumbra Crime News
advertisement

अनैतिक संबंधातून वाद विकोपाला

मुंब्रा येथील कौसा भागात एका काही वर्षापूर्वी झालेले एक जोडप वास्तव्यास होते. सर्व काही सुरळीत सुरु असताना विवाहिते महिलेचे एका व्यक्तीशी अनैतिक संबंध जुळतात आणि यातूनच अनैतिक संबंध असलेल्या व्यक्तीची हत्या करण्यात आलेली असते. मात्र इतका भयानक प्रकार कोणी घडवून आणला आणि यामागील कारण काय होते?

advertisement

मुंब्रा येथील कौसा भागात मंगळवारी एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत तरुणाचे नाव राजू लालन यादव असे आहे. या प्रकरणात अनैतिक संबंधातून वाद निर्माण झाल्याचे तपासात समोर आले आहे.

त्या दिवशी नेमकं घडलं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद मलिक (वय 29) याची पत्नी फरहीन हिचे राजूसोबत संबंध होते. ही गोष्ट मलिकला समजल्यानंतर तो संतापला होता. या कारणावरून वारंवार दोघांमध्ये वाद होत होते मात्र त्या दिवशी तो वाद वाढला आणि रागाच्या भरात मलिक आणि त्याची पत्नी फरहीन यांनी मिळून राजूवर हल्ला केला. त्याच्या डोक्यावर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तलवारबाजी, भाला अन् दांडपट्टा, 9 वर्षाच्या मावळ्याचा पराक्रम, Video पाहाल तर...
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासांत या प्रकरणाचा छडा लावला. आरोपी पती-पत्नीला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
Mumbra Crime : मुंब्रा हादरले! अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट; नवरा-बायकोचे चक्रावणारे कांड आले समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल