13 वर्षीय मुलगी राहत असलेल्या इमारतीचा सुरक्षा रक्षक म्हणून तो व्यक्ती काम करतो. गुरूवारी (22 जानेवारी) दुपारी ती मुलगी इमारतीच्या आवारातून जात होती. त्यावेळी ती एकटीच होती. ती एकटीच असल्याची संधी साधून तिच्या समोर त्या सुरक्षा रक्षकाने गैरकृत्य केले. सुरक्षा रक्षकाचे कृत्य पाहून ती मुलगी देखील घाबरली होती. घाबरलेल्या 13 वर्षीय मुलीने आई- वडिलांना घरी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तिच्या घरच्यांनी लगेचच वेळ न दवडता त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला.
advertisement
मुलीच्या आई- वडिलांच्या सांगण्याप्रमाणे पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास केला जात आहे. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केलेली असून त्याच्या कडून संपूर्ण घटना जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवी मुंबईमध्ये ही घटना घडली असून सध्या पालकांकडून आपल्या मुलीची विशेष काळजी घेतली जात आहे. राहत असलेल्या सोसायटीमध्येच महिला असुरक्षित असल्यामुळे आई- वडिलांकडून सुरक्षेबद्दलचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
