नवी मुंबई महानगर पालिकाकडून वैद्यकीय तज्ञ/ अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि पशु वैद्यकीय अधिकारी) पदासाठी 113 रिकाम्या जागा आहेत. सहाय्यक आयुक्त पदासाठी 5 रिकाम्या जागा आहेत. महापालिका उपसचिव आणि सहाय्यक विधि अधिकारी पदासाठी प्रत्येकी एक जागा रिकामी आहे. तर, कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदासाठी 8 रिकाम्या जागा आहेत, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदासाठी 4 रिकाम्या जागा आहेत.
advertisement
अशा एकूण 132 रिकाम्या जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. वैद्यकीय तज्ञ किंवा वैद्यकीय अधिकारी पदासाठी MD/ MBBS किंवा पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. सहाय्यक आयुक्त पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीची आवश्यक आहे. महापालिका उपसचिव पदासाठी आणि सहाय्यक विधि अधिकारी पदासाठी विधी शाखेतील पदवीची आवश्यकता असून 3 वर्षांच्या अनुभवाची गरज आहे. कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदासाठी विद्युत अभियांत्रिकी पदवीची आवश्यकता आहे. तर, कनिष्ठ अxभियंता (यांत्रिकी) पदासाठी यांत्रिकी अभियांत्रिकीच्या पदवीची आवश्यकता आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रतेप्रमाणेच नोकर भरती केली जाणार आहे.
01 डिसेंबर 2025 पर्यंत अर्जदाराचे 18 ते 38 वर्षे पूर्ण असावे. मागासवर्गीय किंवा अनाथ मुलांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट दिली जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रूपये फी असणार असून मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग आणि आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना 900 रूपये फी असणार आहे. नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये फार मोठ्या काळानंतर होत आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html
वैद्यकीय तज्ञ किंवा अधिकारी पदासाठीची जाहिरात
सहाय्यक आयुक्त, महापालिका उपसचिव पदासाठी आणि सहाय्यक विधि अधिकारी पदासाठीची जाहिरात
कनिष्ठ अभियंता (विद्युत) आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदासाठीची जाहिरात
