नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार,18 डिसेंबरच्या रात्री किर्ती इंडस्ट्रियल इस्टेटच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या घनदाट झुडपांमध्ये एका अनोळखी तरुणाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला होता. चेहरा, खांदे आणि गळ्यावर धारदार शस्त्राने केलेले खोल वार पाहता हत्या अत्यंत निघृण पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान मृताची ओळख टाटा किरसून हेम्ब्रम (वय 30) अशी पटली. तो वालीवच्या गोलानी नाका परिसरात राहत होता. पोलिस तपासात 17 डिसेंबरच्या रात्री टाटा हा त्याच्याच गावातील कुशनू (वय28) याच्यासोबत असल्याची माहिती मिळाली.
advertisement
संशयाच्या आधारे पोलिसांनी चिंचपाडा येथून कुशनूला ताब्यात घेतले. चौकशीत अखेर त्याने जुना वाद डोक्यात ठेवून टाटाची कोयत्याने हत्या केल्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 1:21 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Crime News : पाच वर्षांपूर्वीच्या जुन्या वादाचा घेतला सूड; गावात तरुणाची निर्घृण हत्या
